...आज फिर दिल को हमने समझाया म्हणत मेधा कुलकर्णींची नाराजी शायरीतून व्यक्त

मेधा कुलकर्णी यांना योग्य संधी दिली जाईल, असें निवडणुकीच्या काळात स्वतः चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. जाहीर सभांतही त्यांनी कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याचे मान्य केले होते. या सर्व परिस्थितीमध्ये कुलकर्णी यांना विधान परिषदेची आशा असताना त्यांना टाळण्यात आले
Medha Kulkarni Reacts about Denying her Council Ticket
Medha Kulkarni Reacts about Denying her Council Ticket

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेवर घेतले जाणार असल्याच्या आशेला धक्का मिळत आपला साधा विचारही झाला नसल्याने निराश झाल्या आहेत. 'आज फिर दिल ने एक तमन्ना की ..आज फिर दिल को हमने समझाया' या ओळींच्या माध्यमातून प्रा. कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट करून दिली.

त्यांनी व्यक्त केलेल्या या भावनांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये कुलकर्णी  विद्यमान आमदार असताना त्यांचा पत्ता कापत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची वर्णी लावून कुलकर्णी यांना बाजूला सारले होते.चांगले काम करूनही कुलकर्णी यांना बाजूला केल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. पण त्याचवेळी त्यांना पक्षीय नेतृत्वाकडून विधानपरिषदेवर घेतले जाईल, असा शब्द देण्यात आला होता, असे सांगण्यात येते. तरीही कुलकर्णी यांची नाराजी दूर झाली नव्हती. कारण त्यांचे संभाव्य स्पर्धक मुरलीधर मोहोळ यांना कोथरूड मध्ये पक्ष नेतृत्वाकडून पद्धतशीरपणे ताकद दिली जात होती .

कुलकर्णी यांना योग्य संधी दिली जाईल, असें निवडणुकीच्या काळात स्वतः चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. जाहीर सभांतही त्यांनी कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याचे मान्य केले होते. या सर्व  परिस्थितीमध्ये कुलकर्णी यांना विधान परिषदेची आशा असताना त्यांना टाळण्यात आल्यामुळे त्यांनी सोशल माध्यमावर 'आज फिर दिल ने तमन्ना की आज फिर को दिल को समझाया,' असा हिंदी शेर शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या.

विधान परिषदेच्या माध्यमातून विधानभवनात येण्यासाठी पक्ष संधी देईल यासाठी डोळे लावून बसलेले भाजपचे एकनिष्ठ नेते  एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना कात्रजचा घाट दाखवत भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे पक्षात खदखद पसरली. मेधा कुलकर्णी यांनाही आपल्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना विधानपरिषदेसाठी संधी मिळेल अशी अपेक्षा असताना प्रवीण दटके ,गोपीचंद पडळकर ,अजित गोपछडे,रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेसाठी संधी दिली. त्याबाबत पक्षातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com