...३ जून उजाडायलाच नको असं का म्हणताहेत पंकजा मुंडे

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा ६ वा पुण्यस्मरण दिवस आहे. सध्या कोरोना महामारीमुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. मात्र गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मिडियाद्वारे लाईव्ह होणार आहे
Pankaj Munde Became Emotional remembering Gopinath Munde
Pankaj Munde Became Emotional remembering Gopinath Munde

बीड : तीन जून ही लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यतिथी. या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होणार आहे. पण त्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

त्याच बरोबर ३ जून या दिवसाची मी अजिबात वाट पहात नाही. अगदी २ जून २०१४ ला जाऊन जग थांबावं असं वाटतं...अशी भावनिक पोस्ट पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबूक पेजवर लिहिली आहे. 

३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यावेळची आठवण पंकजा मुंडेंनी काढली आहे. त्यात त्या म्हणतात....
.....आनंद, उत्साह, सामधान होतं. २ जून ला बाबा पोटभऱ रस पोळी खाऊन गेले होते...शाहू म्हणाला, "आज साहेबांनी खूप आमरस खाल्ला,'' खाऊ दे रे शाहू...असं तेच त्याला म्हणाले होते....तेच अखेरचं जेवण त्यांचं त्यांच्या स्वतःच्या घरी... मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही...म्हणून ३ जून उजाडलाच नाही पाहिजे असं वाटतं....

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा ६ वा पुण्यस्मरण दिवस आहे. सध्या कोरोना महामारीमुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. मात्र गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मिडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नका असा संदेश पंकजा मुंडे यांनी दिला आहे. 

तसं ३ जून चा दिवस 'संघर्ष दिवस' म्हणून आपण साजरा करतो. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी कोरोनामुळे काळजी व लाॅकडाऊनच्या नियमांचं पालन करायचं आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. गडावरही नाही आणि मला भेटण्यासाठीही नाही. गडाचा कार्यक्रम लाईव्ह दाखवता येईल...असे आवाहन पंकजा यांनी केले आहे. 

3 जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो ठेवून दोन दिवे लावून अभिवादन करा, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. आजी, सून नात यांनी उजवीकडे तर आजोबा, मुलगा नातू डावीकडे असा दिवा लावायचा आहे. साहेबांचा आवडता पदार्थ बनवायचा, तो काय ते मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही....हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे....असे पंकजा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com