Amravati MP Navneet Rana Made Hair cut of Husband Ravi Rana | Sarkarnama

या खासदाराने केली आमदाराची कटिंग (व्हिडिओ)

अरुण जोशी
शुक्रवार, 29 मे 2020

सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत कटिंग कुठे करावी असा प्रश्न पडतो आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी केस कापून घेतली किंवा चक्क टक्कल करण्याचाही पर्याय निवडला. अमरावती शहरातील आमदार रवी राणा यांच्या डोक्यावरचे केस या लॉक डाऊन च्या काळात चांगलेच वाढल्याने आज त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी घरीच त्यांची कटिंग करुन दिली

अमरावती : कोरोना विषाणू च्या महामारीचा फटका अनेक व्यवसायीकांना सध्या बसला आहे, यात सलून व्यावसायिकही साहजिकच आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरातील सर्वच सलून ची दुकाने ही बंद आहेत त्यामुळे अनेकांच्या दाढी कटिंगची चांगलीच पंचाईत झाली आहे.

सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत कटिंग कुठे करावी असा प्रश्न पडतो आहे. अनेक नागरिकांनी घरच्या घरी केस कापून घेतली किंवा चक्क टक्कल करण्याचाही पर्याय निवडला. अमरावती शहरातील आमदार रवी राणा यांच्या डोक्यावरचे केस या लॉक डाऊन च्या काळात चांगलेच वाढल्याने आज त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी घरीच त्यांची कटिंग करुन दिली. हा विडिओ सध्या शोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या विडिओ मध्ये खासदार नवनीत राणा या आपला पती रवी राणा यांची कटिंग करून देताना दिसत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख