खासदाराच्या कार्यकर्त्याशी पंगा महिला SP ला महाग पडला.... अखेर बदली!

खासदाराच्या कार्यकर्त्याला अटक करणे महागात
shweta dhnakar ips
shweta dhnakar ips

जयपूर : एका खासदाराने महिला पोलिस अधीक्षकाची तक्रार केली आणि राजस्थान सरकारने संबंधित महिला अधिकाऱ्याची तातडीने बदली केल्याचा प्रकार राजस्थानमध्ये घडले. खासदार विरुद्ध पोलिस अधिकारी यांच्या लढाईत खासदाराने बाजी मारली. (Nagour SP Shweta Dhakad)

नागौर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक श्वेता धनकड यांच्याविरुद्ध तेथील खासदार हनुमान बेलिवाल (MP Hanuman Beliwal) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीला कारण ठरले होते ते एका सरपंचाची अटक. या सरपंचाची अटक बेकायदा असल्याबद्दल बेलिवाल यांनी तक्रार केली होती. त्यावरून तेथील काही पोलिस कर्मचाऱ्यांना जयपूर क्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांनी निलंबित केले. त्यानंतर बेनिवाल यांनी धनकड यांच्याही कारभाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. नागौर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, ढासळती कायदा व सुव्यवस्था यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

त्यांच्या या तक्रारीला पोलिस अधिकाऱ्यांनी सोशल मिडियातूनच उत्तर दिले होते. त्यावरून राजकारणी विरुद्ध पोलिस अधिकारी असा संघर्ष सोशल मिडियात सुरू होता. जिल्ह्यातील वाढत्या सट्टेबाजीबद्दल बेनिवाल यांनी आवाज उठवला होता. तसेच तेथील एका बॅंकेवरील दरोडा प्रकरणाचा तपास रखडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. 

मात्र धनकड यांनी हे सर्व आरोप फेटाळत जिल्ह्यातील अनेक गुंडांना तुरुंगात डांबण्यात आले. काहींना हद्दपार करण्यता आले. पोलिसांचा धसका घेऊन काहीजण तर जिल्ह्यात येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी खासदारांच्या टिकेनंतर दिला होता. पण राजस्थान सरकारने सात जून रोजी रात्री उशिरा 15 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात धनकर यांनाही तेथून बदलण्यात आले आणि त्यांनी जयपूर वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com