यंदाचे बजेट 'टॅब'वर; कोरोनामुळे बही खात्याला फाटा - Nirmala Sitaraman will present budget with the help of TAB | Politics Marathi News - Sarkarnama

यंदाचे बजेट 'टॅब'वर; कोरोनामुळे बही खात्याला फाटा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडला जाणारा हा अर्थसंकल्प वेगळ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या वर्षी अर्थमंत्री टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर करतील. पारंपारिक बही खात्याला (बजेट पुस्तिका) कोरोनामुळे फाटा देण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडला जाणारा हा अर्थसंकल्प वेगळ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या वर्षी अर्थमंत्री टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर करतील. पारंपारिक बही खात्याला (बजेट पुस्तिका) कोरोनामुळे फाटा देण्यात आला आहे. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ नोव्हेंबर, १९४७ रोजी पहिला अर्थसंकल्प मांडला गेला. त्यानंतर गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापर्यंत त्याच्या प्रती छापल्या जाऊन त्या खासदारांना वाटल्या जात होत्या. यंदा मात्र अर्थसंकल्पाचे हे पुस्तक कोरोनाचा बळी ठरले आहे. दरवर्षी केंद्रीय अर्थखात्याकडून  अर्थसंकल्पाच्या प्रती छापून घेतल्या जातात. त्यानंतर त्यांचे गठ्ठे करुन ट्रक भरभरून या प्रती संसद भवनात पाठविल्या जातात. यंदा मात्र हे दृश्य दिसणार नाही. 

अर्थसंकल्पाच्या छपाईसाठी नाॅर्थ ब्लाॅकमध्ये बजेट प्रेस आहे. तिथे अर्थसंकल्पाच्या आधी छपाईची धामधूम सुरु असते. ही छपाई सुरु होण्यापूर्वी एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो आणि तो अर्थखात्याच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना वाटला जातो. अर्थसंकल्प छापून पूर्ण झाल्यानंतर तो संसदेत सादर करेपर्यंत या अधिकारी कर्मचाऱ्यांना तिथेच मुक्कामी रहावे लागते. आपल्या कुटुंबाला त्यांना भेटता येत नाही. अर्थसंकल्प फुटू नये, यासाठी ही काळजी घेतली जाते. 

जेव्हा अर्थसंकल्प संसदेत सादर होतो, त्यानंतरच हे अधिकारी कर्मचारी आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला भेटू शकतात. त्यांना या संपूर्ण काळात फोन किंवा ई-मेलही वापरता येत नाही. अर्थखात्याच्या केवळ अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी असते. यंदा अर्थसंकल्प छापलाच गेलेला नाही. संसद सदस्यांनाही हा अर्थसंकल्प 'आॅनलाईन'च उपलब्ध होणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख