ममतांवरील हल्ला : तृणमूलचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणात तृणमूळ काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणात तृणमूळ काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. 

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे एकेकाळची विश्वासू सहकारी असलेले सुवेंदू अधिकारी आता त्यांच्याच विरोधात भाजपकडून नंदिग्राममध्ये मैदानात उतरले आहेत. नंदिग्राममधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या ममतांवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ला झाला त्यावेळी सुरक्षेसाठी पोलीस हजरच नव्हते, असा धक्कादायक गौप्यस्फोट ममतांनी केला आहे. 

ममता बॅनर्जी या काल नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ममता या मोटारीत बसत असताना त्यांच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुरक्षारक्षकांनी ममतांना उचलून मोटारीत बसवल्याचे दिसले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. काल रात्री नंदिग्राममध्ये मुक्काम करण्याचे ममतांचे नियोजन होते. मात्र, या हल्ल्यानंतर त्या थेट कोलकत्याकडे रवाना झाल्या. 

ममतांनी नंदिग्राममधून लढण्याची तयारी मागील काही दिवसांपासूनच सुरू केली होती. त्यांनी अधिकृतपणे घोषणा करत त्यावर शिक्कामोर्तब केले. नंदिग्राम हा तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता नंदिग्राम हा मतदारसंघ तृणमूल व भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरणार आहे. दोन्ही नेते मातब्बर असल्याने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जातील.

दरम्यान, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभू गोयल व जिल्हा पोलिस अधिक्षक प्रवीण प्रकाश यांनी आज ममतांवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या बिरुलिया बाजार परिसरास भेट देऊन पाहणी केली. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com