खासदार नवनीत राणा लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर - Navneet Rana Appointed on Women Committee of Parliament | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार नवनीत राणा लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर

सुरेंद्र चापोरकर 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

दिवाळीच्या शुभपर्वावर लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या आदेशावरून समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे

अमरावती : दिवाळीच्या शुभपर्वावर लोकसभेच्या महिला सशक्तीकरण समितीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या आदेशावरून समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. देशातील इतरही लोकसभेच्या व राज्यसभेच्या महिला खासदार या समितीच्या सदस्य आहेत.

थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या माध्यमातून या समितीद्वारे महिला धोरण ठरविण्यासाठी खासदार राणा यांना संधी मिळणार आहे. देशातील विविध राज्यांत महिलांच्या अत्याचार प्रकरणात या समितीच्या माध्यमातून जाब विचारला जाणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष यांनी आदेश काढून त्यांच्या आदेशानुसार अतिरिक्त सचिव कल्पना शर्मा यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजीच्या पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना नियुक्त केले आहे. 

ही समिती किंवा समितीचे सदस्य ज्या-ज्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत अन्याय होत आहे, असे वाटते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल. ही समिती त्यांच्या सूचना, अभिप्राय लोकसभा अध्यक्षांसमोर ठेवतील व त्यावर अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष घेतील. न्यायोचित धोरण निश्‍चित होईल किंवा ठरविल्या जाईल. या माध्यमातून देशातील ज्या ज्या महिलांच्या बाबतीत अन्याय होत असेल अशा घटकांसाठी खासदार नवनीत राणा ह्या काम करतील. 

यापूर्वीही खासदार नवनीत राणा यांनी अनेक महिलांच्या अत्याचारासबंधी लोकसभेत आपला आवाज बुलंद करून प्रश्‍न मांडले आहेत. आणखीन एक आयुध या समितीच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्ष यांनी राणा यांना उपलब्ध करून दिले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचे खासदार नवनीत राणा यांनी आभार मानले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख