भारती पवारांचे मंत्रीपद... सांगितले बंगलोरला अन् गेल्या दिल्लीला! - Bharti Pawar kept her political rivels in Dark, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भारती पवारांचे मंत्रीपद... सांगितले बंगलोरला अन् गेल्या दिल्लीला!

संपत देवगिरे
गुरुवार, 8 जुलै 2021

मंत्रीमंडळात स्थान मिळविणे, ते देखील पहिल्याच टर्ममध्ये अवघड असते. मात्र घरातील पन्नास वर्षांचे राजकीय संस्कार, राजकीय हुशारी हे गुण त्यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन गेले आहेत. यावेळी देखील अत्यंत गोपनीय पद्धतीने फिल्डींग लावत त्यांनी मी बंगलोरला चालले आहे, असे सांगत त्यांनी दिल्ली गाठली होती. 

नाशिक : मंत्रीमंडळात स्थान मिळविणे, ते देखील पहिल्याच टर्ममध्ये हे अवघड असते. मात्र घरातील पन्नास वर्षांचा राजकीय वारसा, संस्कार, हुशारी हे गुण डॅा. भारती पवार यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन गेले आहेत. (Dr Bharti Pawar had a fifty years political Experence in Family) यावेळी देखील अत्यंत गोपनीय पद्धतीने फिल्डींग लावत त्यांनी मी बंगलोरला चालले आहे, (She said Going Banglore but gone to Delhi)  असे सांगत त्यांनी दिल्ली गाठली होती.

त्यांचे मंत्रीपदाच्या शर्यतीतील स्पर्धक जेव्हा वर्तमानपत्रात मंत्री झालोच अशा प्रचारात गुंतले होते, तेव्हा त्या दिल्लीत फिल्डींग लावण्यात व्यस्त होत्या. ही फिल्डींगच त्यांना उपयोगी पडली. 

डॅा भारती पवार पहिल्याच टर्ममध्ये केंद्रात राज्यमंत्री झाल्या. याचा अनेकांना राजकीय धक्का बसला आहे. विशेषतः नंदुरबारच्या डॅा. हिना गावित यांना हा मोठा धक्का आहे. कारण सामाजिक समतोल साधन्यातून आदिवासी महिला म्हणून सर्वप्रथम नाव चर्चेत आले ते डॅा गावित यांचे. त्याच्या भराभर बातम्या झाल्या. सगळीकडे ही माहिती पोहोचली. डॅा. गावित निर्धास्त होऊन दिल्लीहून केव्हा निरोप येतो याचीच वाट पहात होत्या.

दुसरी टर्म तसेच प्रदिर्घ काळ सत्तेत असलेल्या गावित कुटुंबाला मंत्रीपद आपल्या हक्काचेच असेच चित्र होते. अन्य कोणाचा विचार होऊच शकत नाही, असा त्यांचा कयास होता. मात्र मधल्या दोन दिवसांत जो संपर्क व प्रतिमानिर्मिती आवश्यक होती, ती करण्यात त्या कमी पडल्या. यामध्ये डॅा. प्रितम मुंडे यांचे देखील असेच झाले. असावे. त्यामुळे या दोघींचेही विरोधक (राजकारणात हे विरोधक कधीच डोळ्याने दिसत नाहीत. ते आपल्याच अवती भोवती असतात.) वेगाने कामाला लागले. 

डॅा. भारती पवार यांचे नाव पहिल्या टप्प्यात अजिबात चर्चेत नव्हते. त्यामुळे त्यांनी चार दिवसांपूर्वी नाशिक सोडले. त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले ताई बंगलूरला गेल्या आहेत. लगेच परत येणार आहेत. प्रत्यक्षात त्यांनी थेट दिल्ली गाठली. दोन दिवस त्या पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतील नेत्यांना भेटत होत्या. या कालावधीत त्यांनी तेरा ते चौदा नेत्यांशी संपर्क केला. त्यात स्वतःएव्हढेच पक्षाला काय गरजेचे आहे, हे त्यांनी बिंबवले. त्यांचे हे परिश्रम कामी आले. मंगळवारी सकाळी आठला त्यांना सकारात्मक संदेश प्राप्त झाला. त्यांनी तो गोपनीय ठेवला. थेट शपथविधीची यादी जाहीर झाली त्याच्या चार तास आधीच त्यांचे नाव कळले. शपथविधीची यादी जाहीर झाल्यावर त्यांच्या विरोधकांनी काहीही केले असते तरी त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. अशा तऱ्हेने त्यांनी विरोधकांना शब्दशः कात्रजचा घाट दाखवून मंत्रीपदाची माळ गळ्यात घातली.

डॅा. हिना गावित यांचे मंत्रीपद का हुकले याबाबत अनेक कयास मांडले जातात. मात्र त्या संसदीय कामकाजात विशेष सक्रीय नसतात, असा आरोप त्यांचे विरोधक करतात. स्थानिक स्तरावर मतदारसंघात त्यांनी केवळ विरोधकच नव्हे तर अन्य समाजांशीही शत्रुत्व निर्माण केलेले आहे तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी तर त्यांचा संपर्कच नसतो अशा तक्रारी करुन वरीष्ठांकडे त्यांच्या विरोधात कान भरण्यात आल्याचे कळते. 

भाजपचा एक फॅार्म्युला निश्चित झालेला आहे. विशेष म्हणजे हा फॅार्म्युला अतीवापरामुळे भाजपसाठी महाराष्ट्रात जवळपास अपयशी ठरला आहे. त्यांच्या मुख्य कार्यालयात एक मीडिया सेल आहे. हा सेल कोणता विषय हॅमर करायचा याचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याचा निरोप, प्रेसनोट राज्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यालयात पोहोचते. स्थानिक नेते तो विषय समाज माध्यमे व अन्य माध्यमांतून चर्चेत आणतात. एकच विषय राज्यात दिडशे ते दोनशे ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या नावाने शब्दशः प्रसिद्ध होऊन वातावरण निर्मिती केली जाते. 

गेल्या दिड वर्षात भरती पवार जवळ जवळ प्रत्येक पत्रकार परिषद, पत्रक व केंद्र शासनाच्या निर्णयात केलेला पत्रव्यवहार यातून पक्षात सक्रिय राहिल्या आहेत. डॅा हिना गावित व डॅा प्रितम मुंडे यांचा सामाजिक बलस्थान, प्रभाव निस्चितच मोठा आहे. मात्र सध्या भाजपची धोरणे राजकीय तज्ञांपेक्षा माध्यमतज्ञांकडून पुढे केली जातात. त्यामुळे त्या मागे पडल्या असाव्यात. डॅा भारती पवार त्यात सक्रीय राहिल्या हेच त्यांचे राजकीय यश आहे. हे यश त्यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन गेले. 
...
  हेही वाचा...

भारती पवारांमुळे नाशिकला दिल्लीत पहिल्यांदाच मानाचे पान!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख