शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश  - Yogiraj Gaikwad of Shahuwadi joins NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

योगीराज गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे.

कोल्हापूर : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा स्वागतपर सत्कार झाला. या वेळी मुश्रीफ म्हणाले, "योगीराज गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बळकटी देणारा आहे. त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाच्या भावनेने पक्षप्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.' 

गायकवाड म्हणाले,"राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा प्रवेश करीत आहोत. माजी आमदार (स्व.) संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर जनता पोरकी झाली होती. त्यांच्याप्रमाणेच मुश्रीफ यांच्या कामाची पद्धतही गोरगरीब जनतेला केंद्र मानून आहे.' 

या वेळी उत्तम पाटील-सुपात्रे, विद्यानंद यादव-बांबवडे, विजय पाटील-थेरगाव, संदीप केमाडे-सैदापूर, शिवाजी गावडे-वालूर, सुभाष पाटील-पिशवी, सुभाष कांबळे-भाततळी, बाबू कांबळे-शेंबवणे, रावजी कांबळे-मांजरे, भास्कर कांबळे-घोळसावडे, अजित पिंपळे- पिंपळेवाडी, प्रमोद घाडगे, सागर आळवेकर, भाऊसाहेब घाडगे आदी प्रमुख उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख