महाडिकांची ऐनवेळी साथ सोडणाऱ्या पाटलांवर सतेज यांचा विश्वास

तीन दशके गोकुळची सत्ता महाडिकांच्या हातात होती.
 Hasan Mushrif, Satej Patil .jpg
Hasan Mushrif, Satej Patil .jpg

कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीनंतर आणि धक्कादायक निकालानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे या दोघांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत होती. मात्र, अध्यक्षपदी एकमताने विश्वास पाटील (Vishwas Patil Gokul Chairman) यांची निवड करण्यात आली. गोकुळ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी महाडिक गटातून सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटात प्रवेश केला होता.(Vishwas Patil elected as President of Gokul)

अत्यंत चुरशीची वाटणारी पण कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने एकहाती जिंकलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष पदाची निवड झाली. तीन दशके गोकुळची सत्ता महाडिकांच्या हातात होती. ती सत्ता उलथवण्यात, सत्तातंर करण्यात विश्वास पाटील यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या शिरगाव एमआयडी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.

गोकुळ दूध संघाने वीस लाख लिटर दूध प्रक्रिया प्रकल्प तयार केला आहे, यासाठी जास्तीत जास्त दूध संकलन व्हावे, हे या नवीन अध्यक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. तसेच, दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये जादा दर देण्याचेही आव्हान पाटील यांना पेलावे लागणार आहे. 

गोकुळ निवडणूक 

चार मे रोजी झालेल्या मतमोजणीवेळी गोकुळच्या एकूण 21 जागांपैकी तब्बल 17 जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले होते. तर सत्ताधारी महाडिक गटाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला सतेज पाटील, हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने सुरुवातीपासूनच आव्हान दिले होते. शेवटी पाटील गटने मोठी घोडदौड करत विजय खेचून आणला.

गोकुळची उलाढाल वार्षिक उलाढाल 2100 कोटी रुपयांची आहे. गोकुळमध्ये दररोज 13 लाख लिटर दूध संकलन करण्यात येते.  मुंबईला दररोज 5 लाख लिटर दूध पुरवठा केला जातो. गोकुळकडे पुरवठा करणारे 90 टँकर आहेत. टँकर लावण्यासाठी मोठी स्पर्धा असते. गोकुळ दर दहा दिवसाला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करते. गोकुळकडे 7 लाख लीटर क्षमतेचा अत्याधुनिक शित केंद्र आहे. गोकुळला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दूधसंघाचा स्वतःचा पशु खाद्य कारखाना आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com