Video of deaf brothers goes viral ... | Sarkarnama

मुकबधीर चिमुकल्या भावांचा व्हिडीओ व्हायरल...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

दोन्हीही मुले ट्रॅक्टरच्या साहाय्याने माझ्या द्राक्ष बागेतील औषध फवारणी,  बागेची व इतर शेतीची सगळी मशागत करतात.

पुणे : तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातील गौरव आणि अथर्व एडके या दोन छोट्या भावांचा ट्रॅक्टरने मशागत करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नऊ वर्षाचा अर्थव पाठीमागे बसला आहे तर सात वर्षाचा गौरव ट्रॅक्टर चालवत मेहनत करीत असल्याच हा व्हिडीओ आहे.

याबाबत 'सरकारनामा'ने या मुलांचे वडील उमेश यशवंत एडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, "माझी दोन्ही मुलांना जन्मतःच त्यांना वाचा व श्रवणदोषची समस्या आहे. या दोन्ही मुलांच्यावर उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे मुंबई सारख्या शहरातील नामांकित डॉक्टरांकडे उपचारसाठी प्रयत्न केला. पण मी एक सामान्य शेतकरी असल्याने माझी घरची परिस्थिती हलाखीची आहे. उपचारासाठी साधारणपणे 18 ते 20 लाख इतका खर्च ऐकून मी पूर्ण हतबल झालो. पण कोणत्याही परिस्थितीत मला मुलांच्यावर उपचार करणे गरजेचे होते. त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून मी माझी शेतजमीन विकून उपचार करायचा निर्णय घेतला होता. 

पण याच दरम्यान आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते विकास मस्के यांची भेट झाली. त्यांनी हा संपूर्ण विषय तासगाव तालुक्याचे आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांच्या कानावर घातला. त्यानंतर रोहित पाटील यांच्या पुढाकाराने  यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता माझ्या दोन्ही मुलांच्यामध्ये सुधारणा सुधारणा होत आहे. आज दोन्हीही मुले ट्रॅक्टरच्या साहाय्याने माझ्या द्राक्ष बागेतील औषध फवारणी,  बागेची व इतर शेतीची सगळी मशागत करतात. या मुलांचे या वयातील कष्ट बघून मन भारावून जाते. तितकाच आनंद ही होतो."असे एडके म्हणाले.

 

 

मी ट्रॅकटरने शेतात मेहनत करत असताना मुलांना शेजारी बसवून घ्यायचो. मी कसे ड्रायव्हिंग करतोय हे पाहून मुलेही ट्रॅकटर चालवायला शिकली. आता दोन्ही मुलं मला मदत करतात.   
उमेश एडके

हे देखील वाचा : ट्रम्प म्हणतात, भारत-चीन वादात मला मध्यस्थी करु द्या!
 
नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवर तणाव वाढत असून, चीनने भारतातील नागरिकांना परत बोलाविण्यास सुरूवात केली आहे. या परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव निवळावा यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखविली. दोन्ही देशांकडून हा प्रस्ताव स्वीकारला जाण्याची शक्यता अतिशय कमी आहे. 

तणाव कमी करण्यासाठी चीनने आता पुढाकार घेतला असून, चर्चेतून मतभेद सोडविण्याची तयारी दर्शविली आहे. चीनचे भारतातील राजदूत सून वेईडोंग यांनी भारत व चीन एकमेकांसाठी धोका नाहीत, असे विधान करून परस्पर सहकार्याचे आवाहन केले आहे. मात्र, सीमेवर मोठ्या प्रमाणात तैनात केलेले सैन्य परत बोलावण्याबद्दल चीनकडून अद्याप घोषणा झालेली नाही. लडाखच्या त्सांगपो सरोवराच्या परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारतीय हद्दीतील रस्ते बांधणीला चीनने आक्षेप घेतला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख