उद्धव ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा - Uddhav Thackeray government by Farmers mock | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

जनतेच्या प्रश्नासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असुन सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले शेतकऱ्याना दिले. भातपिकाच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 10 हजार म्हणजे गुंठ्यामागे 100 रूपये देवून ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालविली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सरकार संवेदनशील नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.

लांजा  : भातशेतीला गुंठ्यामागे जेथे 5 हजार खर्च येतो तेथे गुंठ्यामागे 100 रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्याना मिळणार आहे. सरकारने त्यांची एकप्रकारे चेष्टा चालविली आहे. भातपिकाच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 10 हजार म्हणजे गुंठ्यामागे 100 रूपये देवून ठाकरे सरकार काय मदत देणार आहे ? या सरकारला कोकणातील शेतकऱ्यांबद्दल काहीही देणेघेणे नाही, असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

शनिवारी (ता. 24) कोकण दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झालेल्या लांजा तालुक्‍यातील कुवे आणि पन्हळे या दोन गावांतील शेतकऱ्यांची थेट बांधावर जावून भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष  अॅड. दीपक पटवर्धन, उल्का विश्वासराव आदी उपस्थित होते.

या दौऱ्यात, प्रवीण दरेकर यांनी सुरूवातीला कुवे आणि त्यानंतर पन्हळे गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. अनेक अडचणी, पीक कर्ज, राष्ट्रीय बॅंकांकडून होणार त्रास, महावितरण यांचयाकडून होणाऱ्या अडचणी मांडल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे आहे. जिथे गुंठ्यामागे 5 हजार खर्च येतो त्या गुंठ्यामागे 100 रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्याना मिळणार आहे. सरकारने त्यांची एक प्रकारे चेष्टा चालविली असून त्यांना कोकणातील शेतकऱ्यांबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे दरेकर म्हणाले. 

 

सरसकट नुकसानभरपाईसाठी प्रयत्न 

जनतेच्या प्रश्नासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असुन सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले शेतकऱ्याना दिले. भातपिकाच्या नुकसानीपोटी हेक्‍टरी 10 हजार म्हणजे गुंठ्यामागे 100 रूपये देवून ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालविली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सरकार संवेदनशील नाही, असा आरोप दरेकर यांनी केला.

एक नजर ( चौकट पट्टीत वापरणे)
* गुंठ्यामागे 5 हजार खर्च येतो
* भरपाई गुंठ्यामागे 100 रूपये
* कोकणाबाबत असंवेदनशीलता
* सरसकट भरपाईची मागणी
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख