'ते' मोजताहेत फक्त कोरोना मृत्यूचे आकडे ; उपाययोजना कधी ? 

कोरोना तपासणीच्या अहवाल येण्यास इतका उशीर का, या अहवालातून आणखी किती जण पॅाझिटिव्ह येतील, असा प्रश्न सोलापुरकरांसमोर आहे.
Corona Fear
Corona Fear

सोलापूर : दिवसेंदिवस कोरानाचे संकट वाढत आहे. कोरानाशी मुकाबला करताना प्रशासकीय यंत्रणापण हतबल झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याही कोरोनाच्या संकटात सापडला आहे. येथील कोरानाचे संकट कधी टळेल, यांच्या उत्तर लोकप्रतिनिधी जवळ आहे ना प्रशासकीय यंत्रणेकडे. आज किती रूग्ण वाढले, त्यांची चर्चा करणे एवढेच सोलापुरकरांच्या हाती आहे. 


महाराष्ट्रात कोरोना पहिला रूग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर ता. 12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरानाचा पहिला रूग्ण आढळला. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो कोराना पॅाझिटिव्ह आढळला. अन् सोलापुरकरांचा चिंतेत वाढ झाली. गेल्या 45 दिवसामध्ये सोलापुरात कोरानामुळे 66 जणांचा बळी गेला.  

कोराना रूग्णांवर उपचार करण्यासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व अन्य रूग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. संशयीत अनेक जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, यातील 538 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. या अहवालाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.  

सुमारे 538 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतीच दिली. एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असताना, कोरोना तपासणीच्या अहवाल येण्यास इतका उशीर का, या अहवालातून आणखी किती जण पॅाझिटिव्ह येतील, असा प्रश्न सोलापुरकरांसमोर आहे. 

एकीकडे कोराना रूग्णालयात पेंशटची गैरसोय होत असल्याचे सोशल मीडियावर चर्चा होत आहे, तर दुसरीकडे कोराना संशयीतांना क्वारंटाइन केले असता, त्या क्वारंटाइन केंद्रात दाखल झाल्यानंतर काही पेशंटचे अहवाल पॅाझिटिव्ह येत आहेत. याला जबाबदार कोण ? अशी चर्चा होत आहे. बुधवारी तीन जणांचा कोरानामुळे सोलापुरात मृत्यू झाला. सोलापुरात मृत्यूची टक्केवारी 9.89 टक्के आहे. ही टक्केवारी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. 

अजित पवार लक्ष घालतील का ? 


कोरानामुक्त झालेल्यांना घरी सोडल्यानंतर यातील काही रूग्ण पुन्हा कोराना पॅाझिटिव्ह सापडत आहेत. अशा घटना नेहमीच घडत असल्याने आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणाच्या कार्यक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोलापुरातील कोरानाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडी मदत करताना दिसत नाही. सोलापुरकरांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे प्रभारीपद सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व प्रकारात लक्ष घालतील का, याकडे सोलापुरकरांचे लक्ष लागले आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com