राज्य सरकारचे संभाजीराजेंना चर्चेसाठी निमंत्रण 

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मूक आंदोलनास खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांना नेतृत्वात प्रारंभ झाला आहे.
 Sambhaji Raje .jpg
Sambhaji Raje .jpg

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मूक आंदोलनास खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांना नेतृत्वात प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या आंदोलनास उपस्थित आहेत. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील  (Satej Patil) उपस्थित आहेत. (State Government's invitation to Sambhaji Raje for discussion)

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे संभाजीराजे यांना गुरुवारी (ता.१७ जून) वेळ देण्यास तयार आहेत. त्यामुळे संभाजीराजे यांनी गुरुवारी त्यांची भेट घ्यावी असी विनंती पाटील यांनी केली. 

संभाजीराजे यांनी केलेल्या सगळ्या मागण्या संदर्भात राज्य सरकार सकारात्म असल्याचे पाटील म्हणाले. उच्च न्यायालयात जे वकील होते, त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडली. मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. हा प्रश्न संयमाने सुटला पाहीजे, असेही ते म्हणाले. संभाजीराजे यांच्याशी चर्चा करण्याची सर्वांची इच्छा आहे. ही कायदेशीर लढाई आहे. ती कायद्यानेच लढावी लागेल, असेही पाटील म्हणाले. 

आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या आंदोलनाला सहभागी होण्यासाठी काल आंबेडकर यांनी टि्वट केले होते. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैयशील माने, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधी आंदोलनात सहभागी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. 

संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजे यांचीही भेट घेतली. ही भेटही ऐतिहासिक ठरली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट संभाजीराजेंनी घेतली आहे. त्यांनी सरकारपुढे काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण अद्याप सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते आजपासून आंदोलनाला सुरूवात झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com