धक्कादायक : गृहमंत्र्यांच्याच नावाने पोलिस निरीक्षकाने सराफ व्यावसायिकाकडे केली 5 लाखांची मागणी...  - Solapur Police inspector demands Rs 5 lakh from trader | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : गृहमंत्र्यांच्याच नावाने पोलिस निरीक्षकाने सराफ व्यावसायिकाकडे केली 5 लाखांची मागणी... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

बार्शी शहराचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत.  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय सुविधा सोडता अन्य कोणाला ही दुकाने  सुरु ठेवण्यास परवानगी नाही.  यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने कडक निर्बंधांमध्ये सोन्याचे दुकानं सुरु ठेवल्याने काल बार्शी शहर पोलिसांनी दुकानं सील केलं होते.

मात्र, बार्शी शहराचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली आणि ते देण्यास नकार दिल्याने दुकानं सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी गुगळेंनी केला आहे.

''हे सर्व हप्ते गृहमंत्रालयापर्यंत पोहचवावे लागतात,'' असं ही पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावींनी सराफ व्यावसायिक गुगळेंना म्हटल्याचा आरोप केला आहे. याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्वीट करत या प्रकरणाला उजेडात आणलं आहे. या संपूर्ण प्रकरणा संदर्भात पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याशी दूरध्वनी द्वारे बातचीत केली असता, त्यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत आणि संबंधित सराफ व्यापाऱ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटलं आहे. 

हेही वाचा : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' कुणाचा? 
 
ब्रह्मपुरी : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालाने राज्याच्या सध्याच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होण्याची  शक्यता नसली तरीही या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे नेते ही जागा निवडून द्या राज्यातील पुढील करेक्ट कार्यक्रम मी करतो असे ठामपणे जाहीर सभेत बोलले. महाविकास आघाडी आणि भाजपने कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करून 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचा इशारा देत या मतदारसंघात स्थानिक मूलभूत गरजांना बगल देत राजकीय उणे धुणे काढून प्रचाराचे राळ उठवली, ते पाहता राजकीय इर्ष्या टोकाला गेल्याचा  पुरावा ह्या पोट निवडणुकीत दिसून आला. सध्या कोरोना संसर्गाने राज्याला विळखा घातला आहे. रोज राज्यात पन्नास ते साठ हजारांवर कोरोनाबाधित आढळत आहेत. मृत्यूचा आकडादेखील वाढत आहे. यामुळे राज्यातील सरकार, विरोधक, नेते आणि जनताही चिंताक्रांत झाली आहे. आरोग्ययंत्रणा तोकड्या कर्मचऱ्याअभावी कोलमडून पडली आहे. तसेच महसूल व पोलिस प्रशासनास वाढत्या कोरोना संसर्गा बरोबर ह्या पोटनिवडणुकीत अधिक कामाचा ताण होता. दिवस रात्र आपले कर्तव्य त्यांना बजवावे लागेल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख