...म्हणूनच भाजप खासदाराने केले विनायक राऊतांचे कौतुक 

तोच वारसा खासदार राऊत चालवत असून तोंडामध्ये आणि वागण्यामध्ये साजेशे गुण आणि संस्कार खासदार राऊत यांच्याजवळ आहेत.
 ... so BJP MP praised Shivsena MP Vinayak Raut
... so BJP MP praised Shivsena MP Vinayak Raut

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : "शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर काही तुरळक विरोधक टीका करतात. पण, खासदार विनायक राऊत यांनी या लोकसभा मतदार संघाचा बॅ. नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांचा आदर्श वारसा चालू ठेवल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला खासदार विनायक राऊत यांची लोकप्रियता माहिती असल्यानेच कौतुक केले. या कौतुकाने आम्हा शिवसैनिकांची मान उंचावली आहे,'' अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी व्यक्त केली. 

शिवसेनेचे पदधिकारी बंगे म्हणाले, "खासदार राऊत यांच्यावर कोणीतरी टीका करावी आणि आम्ही गप्प राहावे, अशी जर समजुत कोणाची असेल तर ती चुकीची असेल. कारण, आम्हा शिवसैनिकांना खासदार राऊत यांची शिकवण आहे. त्या टीकेला आपण लोकांची कामे करून उत्तर दिले पाहिजे. त्यामुळे आपली लोकप्रियता कमी होत नाही; म्हणूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाखाली आलेल्या चिपी एअरपोर्ट कमिटीच्या खासदारांनी खासदार राऊत यांचे भरभरून कौतुक केले आहे.'' 

"खासदार राऊत यांचे काम आम्हा शिवसैनिकांना प्रोत्साहनात्मक असते. आज या लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांचा वारसा लाभला. तोच वारसा खासदार राऊत चालवत असून तोंडामध्ये आणि वागण्यामध्ये साजेशे गुण आणि संस्कार खासदार राऊत यांच्याजवळ आहेत. याचा आम्हा शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे,'' असेही बंगे यांनी सांगितले. 

कोणी केले होते कौतुक? 

खासदारांच्या 30 सदस्यांच्या केंद्रीय समितीने चिपी विमानतळास ता. 1 मार्च रोजी भेट देत पाहणी केली. समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्यासह "डीजीसीआय'चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत, खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश होता. त्यातील भाजप खासदार जुगल किशोर शर्मा यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या कामाचे कौतुक केले होते. 

या समितीने किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली होती. या वेळी शिवराजेश्‍वर मंदिरात जात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले होते. या वेळी भाजपचे खासदार जुगल किशोर शर्मा यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या कामाचे कौतुक केले होते.

'आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान, महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास भेट देता आली. खासदार विनायक राऊत हे संसदेत सातत्याने येथील विकासकामाबाबत आवाज उठवत असतात. जिल्ह्याच्या महत्वाकांक्षी चिपी विमानतळ प्रकल्पास आज भेट देत पाहणी करण्यात आली असून लवकरच हे विमानतळ सुरू होईल. येथील विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत हे चांगले प्रयत्न करत असून त्यांना यापुढे आमचेही सहकार्य राहील,' असे शर्मा यांनी म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com