शिवसेनेच्या सभापतींनी राजीनामे दिले; पण....

शिवसेनेच्या तीन सभापतींचे राजीनामे होत नसल्याने बदलाची प्रक्रिया खोळंबली आहे.
Shiv Sena sabhapati from Kolhapur ZP resigned; The works put the condition of approval
Shiv Sena sabhapati from Kolhapur ZP resigned; The works put the condition of approval

कोल्‍हापूर : गेली महिनाभर गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्‍हा परिषदेतील पदाधिकारी बदलास अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. शिवसेनेच्या तीन सभापतींचे राजीनामे होत नसल्याने बदलाची प्रक्रिया खोळंबली आहे. यावर संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्‍थितीत आज (ता. २१ जून) तोडगा निघणे अपेक्षित होते. त्यानुसार आज बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव व समाज कल्याण सभापती स्‍वाती सासणे यांनी राजीनामे सादर केले. मात्र, हे राजीनामे मंजूर करण्यापूर्वी संबंधित पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या कामांना लावलेला ब्रेक काढावा, अशी मागणी या सभापतींनी केली. त्यामुळे राजीनामे झाले असले तरी प्रत्यक्षात ते मंजूर होईपर्यंत सदस्यांना वाट पाहवी लागणार आहे. (Shiv Sena sabhapati from Kolhapur ZP resigned; The works put the condition of approval)

कोल्हापूर जिल्‍हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाच्या घडामोडी गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेचे सभापती राजीनामे देत नसल्याने पदाधिकारी बदलात अडचण निर्माण झाली होती. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यासाठी संपर्कप्रमुख दूधवडकर यांनी यापूर्वी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीकडे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर व डॉ. सुजित मिणचेकर यांनी पाठ फिरवली. त्यानंतर संपर्कमंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना सभापतींच्या राजीनाम्यावर भाष्य केले. मुंबईतही घडामोडी झाल्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही शिवसेनेचे सभापती राजीनामा देत नसल्याबददल नाराजी व्यक्‍त केली होती. 

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी लेखी निवेदन तयार करुन पदाधिकारी बदलासाठी दोन्‍ही मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता. तत्‍पूर्वीच शिवसेनेच्या गोठात घडामोडी घडण्यास सुरुवात झाली. त्यानुसार आज दुधवडकर यांच्या उपस्‍थितीत शिवसेनेची सर्किट हाउस येथे बैठक झाली. बैठकीस सत्यजित पाटील सरुडकर व त्यांचे समर्थक बांधकाम सभापती पाटील, डॉ. मिणचेकर व त्यांचे समर्थक शिक्षण सभापती यादव तसेच उल्‍हास पाटील व त्यांचे समर्थक समाजकल्याण सभापती सासणे उपस्‍थित होत्या. तसेच, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्‍हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, अर्जुन आबिटकर उपस्‍थित होते.

सर्व पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा झाली. याठिकाणीच राजीनामा घेतले. या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दूधवडकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. या वेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आबीटकर यांच्याकडे सोपवतानाच त्यांच्याकडेच सभापतींचे राजीनामेही दिले आहेत.

पदाधिकारी बदलात शिवसेनेकडून अडचण नाही

शिवसेनेच्या सभापतींनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्याही काही अडचणी आहेत. त्यांनी मंजूर केलेली कामे थांबवली आहेत. त्यामुळे पुढील दोन, चार दिवसांत त्यांच्या कामांना मंजुरी देवून राजीनामे मंजूर करावेत, अशा सूचना केल्या आहेत. पदाधिकारी बदलात शिवसेनेकडून काही अडचण राहिलेली नाही, असे शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com