सांगलीचे खासदार संजयकाका पाटील कोरोना पॉझिटिव्ह 

खासदार पाटील यांची प्रकृती उत्तम आहे, असे त्यांनी स्वतः सांगितले. माझ्या संपर्कात आलेले कार्यकर्ते, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
Sangli MP Sanjaykaka Patil Corona positive
Sangli MP Sanjaykaka Patil Corona positive

सांगली : सांगलीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील सात आमदारांना यापूर्वीच बाधा झाली आहे. 

दरम्यान, खासदार पाटील यांची प्रकृती उत्तम आहे, असे त्यांनी स्वतः "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. माझ्या संपर्कात आलेले कार्यकर्ते, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. 

गेल्या आठवड्यात तासगावमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोविड केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. तेव्हा तालुक्‍यातील अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. पाटील यांनी जिल्ह्यात परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याची जोरदार टीका सर्वप्रथम केली होती. 

दरम्यान, आठवड्यापूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातील संजय काका पाटील त्यांच्यासमवेत होते. 

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तब्बल सात आमदारांना यापूर्वीच कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यात माजी खासदार, माजी आमदार आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना कोरोनाने झटका दिला आहे. 

यामध्ये सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगाव चे आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम हे कोरोनामुक्त होऊन पुन्हा एकदा कामाला लागले असून अन्य आमदारांवर सध्या उपचार सुरू आहेत. 

आमदार खाडे आणि गाडगीळ हे सध्या घरी थांबून उपचार घेत आहेत. सदाभाऊ खोत कोरोनामुक्त होऊन आंदोलनात उतरले आहेत. आमदार सुमनताई पाटील यांच्या घरातील अन्य मुलासह अन्य सदस्यही पॉझिटिव्ह आहेत. 

पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे दोघे सुरक्षित आहेत. मात्र या सर्व आमदारांसोबत बैठकांना एकत्र असतात. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य नेत्यांची काळजी आता वाढली आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार नितीन शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, संभाजी पवार, कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सांगलीचे माजी महापौर हरून शिकलगार यांचा तर कोरोनाने धक्कादायक मृत्यू झाला. 

कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना रुग्णांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याचे महाकाय आव्हान सांगली जिल्ह्यात समोर उभे आहे. या साथीला रोखण्यात किंवा जनतेला उपचार देण्यात प्रशासन नेते अपयशी ठरल्याची टीका होऊ लागली आहे.

या सर्व विरोधात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी चार दिवसापूर्वी जोरदार आंदोलन करत पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. खासदार संजय पाटील यांनी तर प्रशासन अपयशी ठरल्याचे म्हटले असून निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com