चंद्रकांतदादांची माया कुठंय ते मला माहितीय; हसन मुश्रीफांचा इशारा

भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात.
 Hasan Mushrif, Chandrakant Patil .jpg
Hasan Mushrif, Chandrakant Patil .jpg

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) मला विकावे लागेल असे म्हणत, असले तरी त्यांची माया कुठे आहे हे मला माहिती आहे,'' असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. (Rural Development Minister Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil)

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे पाटील म्हणाले होते. त्यावरुन हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुश्रीफ म्हणाले, ''पाटील यांच्यावर तीन अब्रूनुकसानीचे दावे दाखल केले आहेत.

यावेळी ते म्हणाले की ''केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात. मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

पाटील काय म्हणाले होते?

''माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील. मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्या दाव्यांना घाबरत नाही. पाटील म्हणाले, माझी सर्व प्रॉपर्टी विकली, तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाही. त्यामुळे दाखल केलेला खटला मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावे लागेल'',

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलले पाहिजे. मराठा आरक्षणासाठी सरकार नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या पद्धतीने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असे पाटील म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com