This is routine milk price increase; What happened to the Rs 4 increase
This is routine milk price increase; What happened to the Rs 4 increase

ही तर रुटीन दूधदरवाढ; ४ रुपये वाढीचं काय झालं : गोकुळच्या कारभाऱ्यांना विरोधकांचा सवाल

वाढलेल्या दरानुसार मिळणाऱ्या रकमेचा पूर्ण वाटा दूध उत्पादकाला न देण्याचा घाट कशासाठी घातला जातोय?

कोल्हापूर  ः कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्ताधारी नेत्यांनी मोठा लवाजमा घेऊन दूध खरेदी दरवाढ जाहीर केली. एकूण या लोकांच्या अविर्भावातून किंवा माध्यमातून भासवण्याचा प्रयत्न केला गेला की जणू ही दरवाढ देऊन वचनपूर्ती केली आहे. पण जे समोर दाखवलं जातंय त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे आणि सर्व दूध उत्पादकांनी ही सत्य परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असे पत्रक संघातील चार विरोध संचालकांच्यावतीने प्रसिध्दीला दिले आहे. (This is routine milk price increase; What happened to the Rs 4 increase: Opposition's question to Gokul's stewards)

संघाच्या वाटचालीमध्ये एका ठराविक कालांतराने दूध खरेदी-विक्री दरामध्ये वाढ होतच असते. आताही पुणे-मुंबईमधील दूध विक्रीच्या दरात वाढ केल्यानंतरच इथे खरेदी दरात वाढ केली आहे. आज या सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी आम्ही असतो किंवा दुसरं कोणीही असतं तरी एका ठराविक वेळेनंतर रीतसर खरेदी-विक्री दरामध्ये ही वाढ करावी लागली असती, असे पत्रकात म्हटले आहे. 

त्यातही यंदा केलेल्या नवीन विक्री दरवाढीनुसार पुणे-मुंबई येथील विक्रीमधून संघाला जी रक्कम मिळणार आहे व त्यातून दूध उत्पादकाला खरेदीसाठी जी वाढीव रक्कम देण्यात येणार आहे, यामध्येही प्रचंड तफावत आहे. वाढलेल्या दरानुसार मिळणाऱ्या रकमेचा पूर्ण वाटा दूध उत्पादकाला न देण्याचा घाट कशासाठी घातला जातोय? हासुद्धा प्रश्न आहेच. त्यामुळे या सगळ्यात सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेण्याचं, असं काहीच कारण उरत नाही. 

खरंतर अश्या पद्धतीची ‘रुटीन दरवाढ' याआधीही झालेली आहे आणि यानंतरही होत राहील. फरक एवढाच आहे की, आमची सत्ता होती, तेव्हा आम्ही अशा दरवाढीचं भांडवल केलं नाही, असा टोलाही या पत्रकात लगावला आहे. 

निवडणुकीच्या जाहीर सभेत हेच नेते म्हणाले होते की, ‘ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दूध खरेदीमध्ये ४ रुपये दरवाढ देऊन दाखवतो,’ त्यामुळे शेवटी सर्व दूध उत्पादकांच्या वतीने आमची इतकीच मागणी राहील की, रुटीन दरवाढीचा फायदा घेऊन त्याआड दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा दिलेले आश्वासन खरोखर कधी पूर्ण करणार व दूध उत्पादकांना कायमस्वरूपी दरवाढ कधी देणार याचा खुलासा करावा, अशी मागणी पत्रकात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com