संतप्त कार्यकर्त्यांनी काढली सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

मला त्यांच्या सीएच्या पदवीवर शंका यायला लागली आहे.
 NCP workers protest against Kirit Somaiya .jpg
NCP workers protest against Kirit Somaiya .jpg

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी १२७ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांरुन त्यांचा मतदारसंघ असलेल्या कागलमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. (NCP workers protest against Kirit Somaiya) 

कोल्हापूरमधील कागल हा हसन मुश्रीफ यांचा मतदार संघ आहे. मुश्रीफांवर आरोप केलेल्या सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांचा निषेध करण्यात आला. सोमय्या यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांवर देखील आरोप केले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध नोंदवला.

दरम्यान, सोमय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. 

मुश्रीफांनी आरोप फेटाळले...
 
मुश्रीफ म्हणाले, माझ्यावर १२७ कोटींचा आरोप केला आहे. मला त्यांच्या सीएच्या पदवीवर शंका यायला लागली आहे. आम्ही सगळी कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करत असतो. आरोप तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. अडीच वर्षापुर्वी ईडीने छापा टाकला होता. त्यामध्ये काही अढळले नाही. आम्ही सगळी उत्तरे दिली आहे. अडीच वर्ष छापा डाकून झाली त्यावर अजून काहीच झाले आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

सोमय्या यांनी येवून माहिती घ्यावी. मी त्यांना सागू ईच्छीतो की हजारो शेतकऱ्यांनी या कारखान्यात पैसे गुंतवले आहेत. शेतकऱ्यांना आपला कारखानना पाहिजे होता. म्हणून हा कारखाना काढला. त्यावेळी कोल्हापूर आयकर विभागाने हजारो शेतकऱ्यांची चौकशी केली होती. याची काही माहिती सोमय्या यांना नाही. राजकारणात प्रतिमा तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. माझ्यावर एकही आरोप नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. 

माझ्यावर कोणताच आरोप नाही. मी येत्या दोन आठवड्यामध्ये किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारीचा १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पुढील १० वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला स्थान नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभागामध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्याच्या विरोधात ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे, मुश्रीफ म्हणाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com