राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वैचारिक शत्रू ठरवावा : डॉ. विश्‍वजित कदम 

सांगली जिल्ह्यातील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना ते बोलत होते.
NCP should decide its ideological enemy : Dr. Vishwajit Kadam
NCP should decide its ideological enemy : Dr. Vishwajit Kadam

सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वैचारिक शत्रू कोण आहे, हे नेमके ठरवून पक्षवाढीबाबतचे धोरण ठरवावे, असा सल्ला कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी आज (ता. 25 ऑक्‍टोबर) पत्रकार परिषदेत दिला. 

सांगली जिल्ह्यातील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना ते बोलत होते. सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह मिरज पूर्वमधील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 

या पक्षप्रवेशावर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी टीका करताना राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळावा, असा सल्ला दिला होता. 

पत्रकार परिषदेत आज विश्‍वजित कदम यांना याबाबतचा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, "सांगली बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. त्यामुळे ते पदाधिकारी कॉंग्रेसचे होते, असे म्हणण्याला अर्थ नाही. मात्र, राज्यात आघाडी सरकार आहे. आपला वैचारिक शत्रू कोण, हे निश्‍चित आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षविस्ताराचा विचार करावा.'' 

कदम म्हणाले, "कॉंग्रेस आपल्यापरीने पक्षविस्तार करीत आहे. लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडत आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत कॉंग्रेसने राज्यभर तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलन केले. केवळ सांगली जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांनी या आंदोलनात गावागावांत सहभाग नोंदविला. जिल्ह्यात कॉंग्रेस मजबुतीने काम करीत आहे. त्यामुळे त्याचे परिणाम आगामी काळात निश्‍चित दिसतील.'' 

"आघाडी सरकारमध्ये सध्याचा काळ जनतेसमोर काम करून दाखवण्याचा आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मी एकजुटीने काम करीत आहे. जिल्ह्याच्या विकासाआड राजकारण येऊ देणार नाही,'' असेही विश्‍वजित कदम यांनी म्हटले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com