सोमय्यांना कितीही सुरक्षा पुरवा; त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवूच

त्यांनी कोल्‍हापूरकरांना आव्‍हान दिले आहे.
Nationalist leaders challenge to BJP's Kirit Somaiya
Nationalist leaders challenge to BJP's Kirit Somaiya

कोल्‍हापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्‍या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्‍न केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्‍ह्यातील कार्यकर्ते संतप्‍त झाले आहेत. यातच सोमय्‍या यांनी सोमवारी (ता. २० सप्टेंबर) जिल्‍ह्यात येऊन घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्‍ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्‍हापूरकरांना आव्‍हान दिले आहे. त्यामुळे कितीही सुरक्षा दिली तरी त्यांना कोल्‍हापुरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्‍हान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. (Nationalist leaders challenge to BJP's Kirit Somaiya)

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखाना काढला आहे. लोकांनी आपल्या घामाचे पैसे देऊन शेअर्स खरेदी केले आहेत. मात्र, माजी खासदार सोमय्‍या हे खोटे आरोप करत आहेत. त्यांना बळ देण्याचे काम भाजप करत आहे. मात्र, कोल्हापूरकर जनता गप्‍प बसणार नाही. 

मुंबईतील भय्‍या कोल्‍हापुरात येऊन येथे आव्‍हान देत असेल तर त्याला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. रेल्‍वे स्‍टेशनपासून संताजी घोरपडे साखर कारखाना, कागल, मुरगूड अशा ज्या ज्या ठिकाणी सोमय्‍या जातील, त्या त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांना हिसका दाखवतील, अशा इशाराही पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला.  या पत्रकार परिषदेस अनिल साळोखे, महेंद्र चव्‍हाण, मधुकर जांभळे व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

अनुचित प्रकार घडला तर....

ज्याला निवडणुकीचे तिकिट नाकारले, कोणतेही पद दिलेले नाही, अशा व्यक्‍तीला झेड सुरक्षा का दिली, असा प्रश्नही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वेळी उपस्थित केला. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन पोलिस प्रशासनाने सोमय्‍यांना कोल्‍हापूरचा दौरा थांबवण्यासाठी भाग पाडले पाहिजे. मात्र, त्यातूनही दौरा झाला तर राष्‍ट्रवादीच नव्‍हे सर्वसामान्य कोल्‍हापूरकर रस्‍त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. घोरपडे कारखाना आणि कागल येथे जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा ए. वाय. पाटील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com