‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी या दोन संचालकांची नावे आघाडीवर  - The names of Vishwas Patil and Arun Dongle are being discussed for the chairmanship of 'Gokul' | Politics Marathi News - Sarkarnama

‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी या दोन संचालकांची नावे आघाडीवर 

सुनील पाटील
शुक्रवार, 7 मे 2021

निवडणुकीपूर्वी दिलेली आव्हाने पूर्ण करण्यासाठी अध्यक्षपदाचा योग्य अनुभव असणे गरजेचे आहे.

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) (Gokul) संघाचे अध्यक्ष निवड शुक्रवारी (ता. 14 मे) होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (Vishwas Patil) व अरुण डोंगळे (Arun Dongle) यांची नावे चर्चेत आहेत.

निवडणूक अधिकारी म्हणून करवीर तालुका प्रांताधिकारी वैभव नावडकर काम पाहतील. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व नवोदित संचालकांना निवडीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. (The names of Vishwas Patil and Arun Dongle are being discussed for the chairmanship of 'Gokul')  

गोकुळ दूध संघासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीनंतर आणि धक्कादायक निकालानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे या दोघांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. या दोन्ही संचालकांमुळे तसेच, पालकमंत्री सतेज पाटील आणि  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या योग्य नियोजनामुळे गोकुळच्या राजश्री शाहू शेतकरी पॅनेलला भरघोस यश मिळाले आहे. 

हेही वाचा : समाधान आवताडेंना शिवसेना जिल्हाप्रमुखाने बांधलेल्या ‘समर्थ बंधन’ची चर्चा 

पॅनेल प्रमुख सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आव्हाने पूर्ण करण्यासाठी अध्यक्षपदाचा योग्य अनुभव असणे गरजेचे आहे, त्यासाठी ज्येष्ठ संचालक पाटील व डोंगळे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. या दोघांपैकी एक अध्यक्ष होणार असा अंदाज केला जात आहे. 

गोकुळ दूध संघाने दूध वीस लाख लिटर दूध प्रक्रिया प्रकल्प तयार केला आहे, यासाठी जास्तीत जास्त दूध संकलन व्हावे, हे या नवीन अध्यक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. तसेच, दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये जादा दर देण्याचेही आव्हान पेलावे लागणार आहे. हे आव्हान कोण पेलणार हे आता 14 मे रोजीच समजणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख