राज्यातील तीन नेते कोरोना पाॅझिटिव्ह : खासदार विनायक राऊत यांनाही लागण

राज्यातील 75 हून अधिक आमदार कोरोना पाॅझिटिव्ह
MP vinayak raut.jpg
MP vinayak raut.jpg

मुंबई : राज्यातील आज तीन प्रमुख नेते दुपारपर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री विश्वजित कदम आणि उस्मानाबाद -कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना कोरोनाची लागण झाली.

या तिघांनीही आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. राऊत यांचे दोन अंगरक्षक या आधीच कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. आज राऊत यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. राऊत यांच्याआधी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनाही लागण झाल्याचे उघड झाले. ते कडेगाव येथे घरीच उपचार घेत आहेत. सांगलीतील बहुतांश नेते कोरोनामुळे हैराण झाले आहेत. पालकमंत्री जयंत पाटील वगळता इतर सर्व आमदारांना या विषाणूची लागण झाली आहे. खासदार संजय पाटील यांच्यावहरी उपचार सुरू आहेत. 

शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांचाही अहवाल काल पाॅझिटिव्ह आला आहे. आमदार कैलास पाटील यांनीही आपण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे सांगितले. विधीमंडळ अधिवेशनाच्या अगोदरची टेस्ट निगेटिव्ह आल्याने ते अधिवेशनासाठी हजर राहिले होते, मात्र त्यानंतर काही लक्षणे जाणवत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यानी पुन्हा गूरुवारी (ता.दहा) स्वॅब देऊन खात्री करण्याचा विचार केला, या स्वॅब चाचणीचा अहवाल शुक्रवारी सकाळी त्यांना प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती आमदार घाडगे पाटील यानी दिली आहे. 


त्याना कोरोनाची लागन नेमकी कधी झाली हा प्रश्न निर्माण होत असुन अधिवेशनाच्या अगोदर पाच सप्टेंबरला त्यानी चाचणी केल्यानंतर तो अहवाल निगेटिव्ह तर चारच दिवसानंतरच्या चाचणीमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुंबईमध्येच त्यांना कोरोनाची लागन झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिवेशनानंतरही मतदारसंघाच्या विविध कामासाठी ते मुंबईमध्येच थांबले होते,या दरम्यानच्या काळात ते एक दोन वेळा मंत्रालयातही गेले होते. कोरोनाचा प्रसार होत असताना कायम त्यानी गावभेटी देऊन तेथील यंत्रणेला कामाला लावले होते. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित होणारे हे तिसरे आमदार आहेत. यापुर्वी उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व विधानपरिषद सदस्य सुजीतसिंह ठाकुर हे पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर उपचार होऊन ते पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसुन आले आहे. आमदार घाडगे पाटील यांनी

त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलेली पोस्ट - ः      

नमस्कार, आजच काही वेळापुर्वी माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनाच्या अगोदरही मी टेस्ट केली होती, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मी अधिवेशनात सहभागी झालो होतो.पण काल पुन्हा टेस्ट केली होती, अहवाल आताच प्राप्त झाला असुन त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापुर्वी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे मी अवाहन करतो. माझी प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नाही. लवकरच उपचार घेऊन मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी तयार असेन असा विश्वास व्यक्त करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com