कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 37 जण कोरोना बाधित

कोराना बरा होऊन गेलेल्या एकूण रूग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. दोन रूग्णांचा यापुर्वीच मृत्यु झाला असून उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
more thirty seven corona positive patients found in kolhapur
more thirty seven corona positive patients found in kolhapur

कोल्हापूर : गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढतच चालला असून त्यात आज आणखी 37 बाधितांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 378 वर पोहचली आहे. आज अहवाल पॉझिटीव्ह आलेले सर्वजण अलगीकरण कक्षात असून त्यांना रात्री उशीरापर्यंत सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, आज कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोराना बरा होऊन गेलेल्या एकूण रूग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. दोन रूग्णांचा यापुर्वीच मृत्यु झाला असून उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दुपारी दिडच्या सुमारास 29 जणांचे तर सायंकाळी आठ जणांचे असे 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हे सर्वजण मुंबई, पुणेसारख्या रेडझोन जिल्ह्यातून कोल्हापुरात आले होते. रेडझोनमधून येणाऱ्या सर्वांनाच किणी टोल नाक्‍यावरून थेट सीपीआरमध्ये आणण्यात आले होते. सीपीआरमध्ये त्यांचा स्वॅब घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज ज्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

आज अहवाल पॉझीटीव्ह आलेल्यात सर्वाधिक 16 जण हे आजरा तालुक्‍यातील आहेत. त्या खालोखाल शाहुवाडी तालुक्‍यातील 15 जण तर पन्हाळा तालुक्‍यातील तीन, भुदरगडमधील दोन तर तर राधानगरी तालुक्‍यातील एकाचा समावेश आहे. आज सहा जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यात नेसरी (ता. चंदगड) येथील दोन तर मागणगांव, केर्ले (ता. शाहुवाडी), सातवे (ता. पन्हाळा) आडकूर (ता. चंदगड) येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात मुंबई, पुण्यासह रेडझोन जिल्हे व परराज्यातून आलेल्या 5671 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. याशिवाय शहरातील प्रलंबित स्वॅबची संख्या वेगळी आहे. सर्वाधिक 1316 अहवाल एकट्या गडहिंग्लज तालुक्‍यातील प्रलंबित आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क व डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेत या स्वॅबची तपासणी होती.
 
तालुकानिहाय पॉझीटीव्ह रूग्ण :
आजरा- 32, भुदरगड - 49, चंदगड- 25, गडहिंग्लज - 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, करवीर - 11, कागल - 11, पन्हाळा - 20, राधानगरी - 48, शाहुवाडी - 119, शिरोळ - 5.

इतर पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या
इचलकरंजी नगरपालिका - 6, जयसिंगपूर शहर- 3, कुरुंदवाड - 1 कोल्हापूर महापालिका - 20, इतर राज्यातील - 5 (पुणे-1, कर्नाटक- 2, आंध्रप्रदेश-1, सोलापूर-1 )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com