3Pune_police_officials_quara.
3Pune_police_officials_quara.

पोलीस निरीक्षकाच्या बदलीवरून आजी-माजी आमदार आमने सामने..

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप हे पोलीस निरीक्षकांच्या बदलीवरून आमने सामने आले आहेत.

पुणे : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रम सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप हे पोलीस निरीक्षकांच्या बदलीवरून आमने सामने आले आहेत. आमदार सावंत यांनी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या विरोधात तर माजी आमदार जगताप यांनी बाजूने भूमिका घेतली आहे.

जत तालुक्यातील राजकीय वातावरण पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या बदलीमूळे चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या त्रासाला कंटाळून शेळके यांनी स्वतःहुन बदली करून घेतली असा आरोप भाजपासह विरोधी पक्षांनी केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, "तालुक्यातील गोरगरिबांना न्याय देणारा अधिकाऱ्यांची बदली काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. शेळके यांनी तालुक्यातील अवैद्य धंदे बंद केले होते. सावकारी करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केला होता. कोरोनाच्या काळात त्यांनी प्रभावीपणे काम केले, पण काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना त्रास दिला. त्यांची बदली व्हावी, म्हणून आटोकाट प्रयत्न केले. एक चांगला अधिकारी तालुक्यात राहू नये म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांची बदली रद्द व्हावी" अशी मागणी जगताप यांनी केली.

"रामदास शेळके हे अतिशय उद्धट अधिकारी आहेत. त्यांनी तालुक्यातील सामान्य लोकांना खूप त्रास दिला आहे, असा अधिकारी आजवर लोकांनी पाहिलेला नव्हता. विरोधकांनी अनेक चांगले अधिकारी बदली करून घालवले आहेत. आणि उद्धट अधिकाऱ्यांना ते पाठीशी घालत आहेत. रामदास शेळके यांच्या कार्यपद्धतीला लोक वैतागले होते. अशा उर्मट अधिकाऱ्याला विरोधक पाठीशी घालतात हे दुर्दैवी आहे." दरम्यान या प्रकरणामुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

हेही वाचा : अजित पवारांनी इशारा दिल्यानंतर पोलिस यंत्रणा रात्रीच कामाला लागली 

माळेगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतर बारामती तालुक्यात पोलिस यंत्रणा कशी खडबडून जागी होते, याचे उत्तम उदाहरण माळेगावकरांना पहावयास मिळाले. उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या विशेष पोलिस पथकाने माळेगावात जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत ३२ जुगाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तर तब्बल ९ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड मिळून आली. सात मोटारसायकली, एक फोरव्हीलर गाडी, मोबाईल, टेबल व खुर्चा, पंत्यांचा कॅट आदी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अजित पवार यांनी तालुक्यातील अवैद्य व्यावसाय व गुन्हेगारीबाबत नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.४) रात्रीच्यावेळी पोलिसांनी माळेगावात केलेल्या धडक कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक रमेश बाबुराव केकाण हेच फिर्यादी झाले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com