आमदार सदाभाऊ खोतांनी केला ठाकरे सरकारचा निषेध... - MLA Sadabhau Khot protests against Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सदाभाऊ खोतांनी केला ठाकरे सरकारचा निषेध...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

सदाभाऊ खोत यांनी  मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत सरकारचा निषेध केला.  

इस्लामपूर (सांगली) : राष्ट्रीय नाभिक संघटना व रयत क्रांती संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नाभिक बांधवांच्या व्यथा सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी सलून पार्लर समोर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर (ता. वाळवा जि. सांगली) येथे मागण्यांचे फलक हातात धरून घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.
      

यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ''कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील अनेक सलून व्यावसायिकांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या केलेल्या नाभिक बांधवांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही.  गेली अनेक दिवस सरकारने लॉकडाउन केल्यामुळे सलून दुकाने उघडता आली नाहीत. अनेक नाभिक बांधवांची दुकाने भाड्याने आहेत. त्याचे भाडे, वीजबिल त्यांच्या अंगावर आले आहे.''

''जर सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर सलून व्यावसायिकांना सरकारने प्रति महिना ५० हजार रुपये मदत देऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी. जर सरकार त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणार नसेल तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल'' अशा इशारा  सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

हेही वाचा  : भाजपचे प्रवक्ते उपाध्याय म्हणाले, ''ठाकरे सरकार, 15 लाख लशींचा हिशोब द्या'' 
 
पंढरपूर : ''केंद्र सरकारने राज्य सरकारला सुरवातीच्या काळात लशींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला होता. परंतु राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास  लोकांनाच लस दिली गेली आहे. त्यातच तीन लाख लशी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने 15 लाख लशींचा हिशोब द्यावा.  आता पर्यंतच्या पुरवठा केलेल्या लशींची चौकशी करावी,'' अशी मागणी ही भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली. सुरवातीला फंट लाईनवरच्या लोकांचे लसीकरण करणे आवश्यक होते. परंतु सरकारने नियमबाह्यपणे खास लोकांचे लशीकरण केले आहे. शिवाय 3 लाख लोक राखीव ठेवल्याने सध्या राज्यात कृत्रिम लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्रावर आरोप करत आहे. या निमित्ताने ठाकरे सरकारचा हा ढोंगीपणा समोर असल्याचेही केशव उपाध्याय यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख