आमदार प्रकाश आवाडेंची ताकद महाडिकांच्या पारड्यात; ‘गोकुळ’साठी दिला पाठिंबा

स्वाभिमानी' चे अध्यक्ष राजू शेट्टी आणि आजऱ्यातील अशोक चराटी यांनी बुधवारी (ता. 28) सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला होता.
MLA Prakash Awade's support to Mahadik's group in Gokul's election
MLA Prakash Awade's support to Mahadik's group in Gokul's election

कोल्हापूर : गोकुळ दुध संघाचे काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून हा संघ देशभर नावाजला जातो. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ संघाने मोठी भरारी घेतली आहे. विशेष म्हणजे अडचणीच्या काळात जेव्हा संपूर्ण राज्यात दुधाचे दर कमी झाले होते, त्यावेळी सत्तारूढ गटाने दुधाचा खरेदी दर कमी न करता उत्पादकांना पाठबळ दिले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर गोकुळच्या विकासाचा वेग कायम रहावा, यासाठी सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला पाठींबा देत असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आज (ता. २९ एप्रिल) जाहीर केले.

‘गोकुळ'च्या निवडणुकीत आज आमदार प्रकाश आवाडे यांनी सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक, माजी खासदार धनंजय महाडीक यांच्या उपस्थितीत आवाडे यांच्या रूईकर कॉलनीतील निवासस्थानी पाठिंबा जाहीर केला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हेही उपस्थित होते. पी. एन. यांनी आवाडे यांचे स्वागत केले. ‘गोकुळ'च्या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान होत आहे. ‘स्वाभिमानी' चे अध्यक्ष राजू शेट्टी आणि आजऱ्यातील अशोक चराटी यांनी बुधवारी (ता. 28)  सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला होता.
 
गोकुळ सहकार क्षेत्रातील अत्यंत नावाजलेली आणि आदर्शवत कार्य करणारी संस्था असून, त्याची प्रगती सुरू ठेवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे आवाडे यांनी सांगितले. त्यानंतर या नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. चर्चेत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्‍मिरे, माणगावचे सरंपच राजू मगदूम सहभागी झाले होते. 

आमदार आवाडे म्हणाले, ‘‘आपण गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. सहकारी संस्था व्यवस्थीत चालवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, याची आपल्याला जाणीव आहे. सत्तारूढ गटाने चांगले कामकाज करत, दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. तसेच जेव्हा संपूर्ण राज्यात दुधाचा दर उतरला होता, त्यावेळी गोकुळ दुध संघाने मात्र सभासदांकडून, ठरलेल्या दरानेच दूध खरेदी केले होते. ही बाब दूध उत्पादक सभासद कधीही विसरणार नाहीत.' 

आवाडे गटाच्या पाठींब्यामुळे सत्तारूढ गटाला आणखी बळ मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार पी.एन.पाटील यांनी व्यक्त केली. आमदार आवाडेंचा सहकार क्षेत्रातील अनुभव, गोकुळसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र कार्यरत राहू, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले. 

सत्तारूढ गटाला दूध उत्पादक सभासद आणि महत्त्वाच्या नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने, सत्तारूढ गटाची स्थिती भक्कम बनल्याचे स्पष्ट दिसते, तर विरोधी आघाडीत बिघाडी झाल्याचा दावा महाडीक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com