mla prakash abitkar demands modified machinery for kolhapur district | Sarkarnama

स्वॅब तपासणीसाठी अद्ययावत मशीनरी द्या : आमदार अबीटकर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

राज्यातील डॉक्‍टर्स, पोलीसाप्रमाणेच गाव पतळीवर काम करणाऱ्या दक्षता समितीमधील लोक, पोलीस पाटील व कोवीड केअर सेंटमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांचा देखील विमा उतरावा.

कोल्हापूर : रेडझोनमधून कोल्हापुरात येणाऱ्या लोकांची स्वॅब तपासणी लवकर व्हावी यासाठी छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात अद्ययावत मशीनरी बसवा यासह विविध मागण्या आज आमदार प्रकाश अबीटकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नागरीक व विद्यार्थी पुणे, मुंबई यासरख्या शहरांमध्ये उदरनिर्वाह व शिक्षणसाठी वास्तव्यास असतात. महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केल्यामुळे हे नागरीक आप-आपल्या गावी येत आहेत. सदर नागरीक रेड झोन मधून येत असल्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी, स्वॅब तपासणी करणे आवश्‍यक आहे. हे लोक अधिक प्रमाणात येत असल्यामुळे स्वॅबचे प्रमाण अधिक आहे. परंतू कोल्हापूर येथील CPR येथे आद्यावत मशिनरी उपलब्ध नसल्यामुळे स्वॅबचा रिझल्ट येणेसाठी विलंब होत आहे. त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या नागरीकांचे मोठी अडचण होत आहे. तरी खासबाब म्हणून स्वॅब तपासणीकरीता आवश्‍यक असणारे अद्यावत मशीनरी कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात यावे, अशी मागणी श्री. अबीटकर यांनी केली.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत 2 लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली. परंतू संपुर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणुचा फैलाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यास विलंब होत आहे, ते मिळावे. राज्यातील डॉक्‍टर्स, पोलीसाप्रमाणेच गाव पतळीवर काम करणाऱ्या दक्षता समितीमधील लोक, पोलीस पाटील व कोवीड केअर सेंटमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांचा देखील विमा उतरावा, अशीही मागणी श्री. अबीटकर यांनी केली. राज्यातील हॉटेल कामगार, रिक्षा चालक, वडाप चालक, गवंडी कामगार, कलाकार व नाभीक लोकांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, यासह विविध मागण्या व मुद्ये आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केले असून
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार
पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत नेतृत्वबदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे वृत्त आहे. नुकतीच पटोले यांनी केलेली दिल्लीवारी हा त्या घडामोडींचा भाग असल्याचे मानले जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांना सामोरे गेला. अनेक नेत्यांनी पक्षांतरे करूनही काँग्रेसला नुकसान झाले नाही. 2009 च्या तुलनेत 2 जागा जास्त निवडून आल्या. निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोडी झाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूलमंत्रीपद मिळाले. ते सद्या प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्रीपद या दोन्ही जबाबदारी सांभाळत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख