कुलगूरुंना लवकर बोलवा म्हणजे आम्हाला जायला बरं !

कुलगूरू १२ वाजता येणार आहेत का?. लवकर बोलवा म्हणजे जायला बरं अस म्हणत पालकमंत्री सतेज पाटील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना उद्देशून म्हणाले. यातून त्यांनी माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, प्रतापसिंह पाटील, उदय पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
Satej Patil
Satej Patil

कोल्हापूर : कुलगूरू १२ वाजता येणार आहेत का?. लवकर बोलवा म्हणजे जायला बरं अस म्हणत पालकमंत्री सतेज पाटील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना उद्देशून म्हणाले. यातून त्यांनी माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, प्रतापसिंह पाटील, उदय पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी ते म्हणाले, तुम्ही कुलपती आहात, वाट करत-करत तुम्हाला जोडणी लावायला चांगला वेळ मिळाला आहे. असं प्रत्युत्तर माजी आमदार संजय घाटगे यांनी तर, तुमचे ठरावदार गेल्यानंतर आमचे ठरावदार येणार आहेत. आम्ही आमच्या मतदारांना कोरोना होऊ नये याची काळजी घेतोय असे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी दिले. यावर एकच हशा पिकला. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघासाठी आज जिल्ह्यातील ७० केंद्रावर मतदान झाले. करवीर तालुक्‍यातील ६४१ ठरावदारांचे मतदान विवेकानंद कॉलेज येथे झाले. यावेळी सत्तारूढ आणि विरोधी गटातील लोक समोरा-समोर उभे राहून मतदारांचे स्वागत करत होते. यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील व सत्तारूढ गटातील नेत्यांची चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली. 

गोकुळ संस्थेसाठी आज सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी सकाळी साडे अकराला राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे ठरावदार पिवळ्या टोप्या आणि पिवळे मास्क बांधून मतदान केंद्राच्या ठिकाणी आहे. त्यानंतर हे मतदार आपआपल्या मतदान केंद्रात गेल्यानंतर सकाळी ११.४५ ला शाब्दिक जुगल बंदी सुरु झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता समोर मतदारांच्या स्वागतासाठी उभे असणाऱ्या सत्तारूढ गटाच्या संचालकांना म्हणाले, कुलगूरू (माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता) कुठे आहेत. बोलवा आता, बारा वाजले म्हणजे आम्हाला येथून जायला बरं. 

यावर, तुम्ही कुलपती अस श्री घाटगे यांनी आणि आम्ही आमच्या मतदारांना कोरोना होवू नये याची काळजी घेतोय. तुम्ही मतदान केल्यानंतर आमचे ठरावदार मतदानाला येणार आहेत. यावर, पालकमंत्री पाटील यांनी फोन करुन कुलगूरुंना बोलवून घ्या, असे आव्हान दिले. तुमचा मॉब मोठा आहे. आमच्याकडे किती लोक असायचे आहेत, हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे लोक आमच्याकडे होते. तुंमच्याकडे मोठा मॉब होता. असे एका सत्तारूढ संचालकांनी सांगितले. सुमारे पाच मिनिटे सुरु असणाऱ्या या जुगलबंदीमूळे उपस्थितांना जोरदार हसायला भाग पाडले. 
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com