मी, घाटगे, मंडलिक म्हणजे अमर, अकबर, ऍन्थनी : हसन मुश्रीफ  - Me, Ghatge, Mandlik means Amar, Akbar, Anthony: Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

मी, घाटगे, मंडलिक म्हणजे अमर, अकबर, ऍन्थनी : हसन मुश्रीफ 

सुनील पाटील 
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

मी आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक भाऊ-भाऊच आहोत.

कोल्हापूर : मी आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक भाऊ-भाऊच आहोत. खासदार मंडलिक, संजयबाबा घाटगे आणि मी म्हणजे अमर, अकबर आणि ऍन्थनी आहोत. जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ (गोकुळ) निवडणुकीत जरा चढाओढ होईल पण आम्ही एकच आहोत, असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत मुश्रीफ बोलत होते. 

"संजय मंडलिक आणि आपण 22 वर्षे, तर संजयबाबा घाटगे आणि मी सहा विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत. पण, काही माणसं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घेऊन आमच्या घरावर प्राप्तीकर विभागाचा (इन्कम टॅक्‍स) छापा टाक, ईडीचा छापा टाक, विधवा महिलांची पेन्शन रद्द करुन त्यांना टाचा घासायला लावण्याचे काम करत आहेत, असे आम्ही कधी करत नाही,' असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. 

मुश्रीफ म्हणाले, "संजय घाटगे, संजय मंडलिक आणि माझ्यामध्ये काही मतभेद झाले असतील. पण, एकमेकांची कधीही अडवणूक केलेली नाही. निवडणूक झाली की विषय संपला. असं समजून आम्ही काम केले आहे. पण काही माणसं अशी तयार झाली आहेत की आमच्यावर कधी प्राप्तीकर विभागाचा छापा टाकायला लावायचा, कधी ईडीचा छापा टाकायचं तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घेवून विधवा महिलांचा पेन्शन रद्द करुन टाचा घासायला लावण्याचे काम करत आहेत. असं आम्ही कधीच केलेले नाही आणि भविष्यात करणार नाही.'' 

आगामी काळात आम्ही तिघेही अमर, अकबर आणि ऍन्थनी कागल तालुक्‍याच्या विकासासाठी एकच राहणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख