मंडलिकसाहेब, कोल्हापूरचे नेतृत्व करण्याची तुमच्यात ताकद : यड्रावकर 

पालकमंत्री सतेज पाटील हे या कार्यक्रमासाठी येणार होते.
Mandlik Saheb, your strength to lead Kolhapur: Yadravkar
Mandlik Saheb, your strength to lead Kolhapur: Yadravkar

मुरगूड (कोल्हापूर) : "खासदार संजय मंडलिक जिल्ह्याच्या राजकारणात तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आम्हाला कुणाला फसवता येत नाही, जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची ताकद तुमच्यात आहे,' असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी आपल्या भाषणातून केले. त्यावर "मी पुढे, तुम्ही मागे, असे काही नाही; तर दोघे सोबतच जायचे आहे,' असे म्हणत जिल्ह्याचे नेतृत्व आपण दोघे मिळून करू, असे खासदार संजय मंडलिक यांनी अप्रत्यक्ष सांगितले. 

मुरगूड नगरपरिषदेच्या इमारतीसमोर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन आणि नगरपरिषदेच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयीन इमारतीचे उद्‌घाटन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. खासदार संजय मंडलिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्या वेळी वरील संवाद झाला. या वेळी ऍड. वीरेंद्र मंडलिक, विजय देवणे, सुरेश कुराडे आदी प्रमुख उपस्थित होते. 

कोरोना काळात बहुतांशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बंद होते. मात्र सरकारी दवाखान्यातील चांगल्या सुविधा व उपचाराने कोरोनाग्रस्त बरे झाले. त्यानंतर मात्र खाजगी दवाखान्यात पॅकेज सिस्टीम आली. अडीच - तीन लाखांची बिले घेतली गेली. याच्या तक्रारी व दवाखान्यांची नावे नागरिकांनी दिल्यास जनतेची लुबाडणूक करणारे खासगी दवाखाने बंद करू, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. 

ते म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय 50 बेडचे व्हावे, अशी मागणी आहे. या मागणीचा विचार करुन हे रुग्णालय 50 बेडचे करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. 

संजय मंडलिक म्हणाले, गेल्या वर्षभरात ग्रामीण आरोग्य सक्षमीकरणाचे काम मी चांगल्या पद्धतीने करू शकलो. संघर्ष करुन तालुक्‍याचा विकास होणार नाही, म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील हे या कार्यक्रमासाठी येणार होते. पण बरेच दिवस त्यांची तारीख ठरत नव्हती. ती का ठरत नव्हती, याचा शोध यड्रावकरसाहेब आता तुम्हीच घ्या. 


विजय देवणे म्हणाले, कोरोना काळात अनेक खासगी डॉक्‍टरांनी सर्वसामान्य जनतेची अक्षरक्ष: लूट केली आहे. लाखो रुपयांची बिले लोकांकडून उकळली आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. 

सुरेश कुराडे म्हणाले, संजय मंडलिक हे जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचे सर्वपक्षीय खासदार आहेत. आता त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम करावे. 

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, कोरोना काळात ज्या खाजगी डॉक्‍टरांनी गोरगरिबांचे पैसे लुबाडले, त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी. या वेळी नगरपरिषदेच्या शताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, पांडुरंग भाट, सुखदेव येरुडकर, प्रकाश चौगुले, शकुंतला शिंदे, शुभांगी गवाणकर,नम्रता भांदीगरे, माया चौगले, रेखा सावर्डेकर आदींसह ग्रामीण रुग्णालयाचे एन. बी. डवरी डॉ. पल्लवी तारळकर, डॉ. अमोल पाटील, मुख्याधिकारी संजय गायकवाड आदींचा हस्ते सत्कार करण्यात आला. 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com