2Sambhaji_20Raje.jpg
2Sambhaji_20Raje.jpg

Maratha Reservation : सर्वच पक्षांनी एकत्र या : संभाजीराजे..मराठा समाज जे सांगेल..तीच माझी भूमिका.

आमच्यासाठी कोणताही पक्ष आपला किंवा परका असणार नाही तर सर्वांनी एकत्र बसून मार्ग काढावा, अशी मागणी समाज करत आहे.

कोल्हापूर  :  "सर्वोच्च न्यायालाने मराठा आरक्षणाला  maratha reservation स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये अभूतपूर्व खदखद दिसून येत आहे. यापुढे मराठा समाज जे सांगेल आणि जी भूमिका ठरवेल तीच संभाजीराजेंची भूमिका असेल," असे खासदार संभाजीराजेंनी mp sambhaji raje आज स्पष्ट केले. mp sambhaji raje will start maharashtra tour for maratha reservation

संभाजीराजे म्हणाले की, मी समाजाचे नेतृत्व करत नसून कुटुंब प्रमुख या नात्याने समाजाची भावना, समाजातील खदखद राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोचवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. आंदोलन आक्रमक पद्धतीने करायला दोन मिनिट पण लागत नाहीत. परंतु हा जो आरक्षणाचा तिढा आहे तो कशा पद्धतीने सोडवता येईल, यावर माझा भर असणार आहे. आमच्यासाठी कोणताही पक्ष आपला किंवा परका असणार नाही तर सर्वांनी एकत्र बसून मार्ग काढावा, अशी मागणी समाज करत आहे.

खासदार संभाजीराजे  "आज मराठा समाजावर अन्याय झालाय. आताही माझ्या आजूबाजूला जी लोकं आहेत. ती समाजातील बारा बलुतेदारांनी समाजाला एकत्र येऊन पाठिंबा दिलाय. शाहू महाराजांचा विचार कोल्हापुरातील सर्व बहुजन समाजातील लोकांनी जपलाय आणि यापुढेही जोमानं हा विचार जपू, असा संदेश या लोकांनी आज दिलाय. यामुळे मी आज सर्वांचे आभार मानतो."

"कोरोना संकटात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो. मला अत्यंत आनंद झाला. मी गहिवरुन गेलो, भारावून गेलो. ही शाहू महाराजांची नगरी, शाहू महाराजांनी जी दिशा राज्याला आणि देशाला दिली. ती पुरोगामी चळवळीची आहे. आणि संपूर्ण पुरोगामी चळवळच ही आहे की, संपूर्ण बहुजन समाजाला कसं एकत्र आणता येईल, या समाजाला न्याय कसा देता येईल. म्हणून 1902 ला बहुजन समाजाला 50 टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता," असे संभाजीराजे म्हणाले.  

"सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला, जो गायकवाड कमिशनच्या माध्यमातून आरक्षणाचा अहवाल देण्यात आला होता. तो पूर्णपणे धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे यापुढे समाजानं आपली भूमिका कशी मांडायची, मार्ग काय काढायचा या दृष्टीकोनातून मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे," असे संभाजीराजेंनी सांगितले.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com