चंद्रकांतदादा, फडणवीसांसाठी तो ही वेळ खूप झाला : वडेट्टीवार

ज्या कौशल्याचीआवश्‍यकता आहे. ते देवून मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, त्यांना कौशल्याचे धडे दिले जातील, यातून संस्थेची व्याप्ती वाढविली जाईल.
maharashtra cabinet minister vijay vadettiwar taunts chandrakant patil
maharashtra cabinet minister vijay vadettiwar taunts chandrakant patil

कोल्हापूः सारथी संस्थेबाबात बोलताना मागील सरकारने काय दिवे लावले असा टोला मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत लगावला. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर कोरोना बाबतचे प्रश्‍न दोन दिवसांत संपवले असते अशा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर "तो ही वेळ खूप झाला' असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. कोकणातील आपत्तीला मदत पोचली नसल्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर त्यांनी ताप आला तरीही तीन-चार दिवस गोळ्या घ्याव्या लागतात, असे सांगून त्यांची खिल्ली उडवली. एकंदरीतच त्यांनी विरोधकांवर टोलेबाजी करून त्यांच्या कामाचा पंचनामा केला.

सारथी संस्थेच्या कामकाजाबाबत खासदार संभाजीराजे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्याबाबत मंत्र्यांना विचारले असता त्यांनी मागील सरकारने काय दिवे लावले. पन्नास कोटींची तरतूद केली होती. पाचशे कोटींची नाही, असा सवाल करीत कोणत्याही परस्थितीत सारथी संस्था बंद पडणार नाही. ज्या कौशल्याची आवश्‍यकता आहे. ते देवून मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, त्यांना कौशल्याचे धडे दिले जातील, यातून संस्थेची व्याप्ती वाढविली जाईल, असे स्पष्ट केले. केवळ फेलोशीप देवून चालणार नाही. त्याचा उपयोग किती होतोय याचाही विचार केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. राजेंनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करण्याचे म्हटले आहे, त्याची भूमिका योग्य आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्‍न सुटणार असेल तर आनंदच आहे. मला दिलेल्या निधी इतकाच मी खर्च करू शकतो. याचाही विचार केला पाहिजे.

कोकणातील चक्रीवादळानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी मदत पोचली नसल्याचा आरोप केला आहे याप्रश्‍नावर मंत्री म्हणाले," ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांची दुसरी कोणती भूमिका काय असू शकते. एक दिवसांच्या वादळाने सगळं उद्धवस्थ केले. सरकार कोकणवासियांच्या पाठीशी ठाम उभे आहे. 498 कोटींची मदत दिली आहे. नुकसान भरपाई वाढवली आहे. त्यामुळे ताप आला तरीही तीन-चार दिवस गोळ्या घ्याव्या लागतात. हे फडणवीस यांना सांगावे लागते काय ? मदत देण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोचली आहे. आठवड्यात सर्वांना वीज मिळणार आहे. कोकणवासियांना कोणत्याही परस्थितीत निधी कमी पडू देणार नाही.''

केवळ फेलोशीप देवून चालणार नाही. त्याचा उपयोग किती होतोय याचाही विचार केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. राजेंनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करण्याचे म्हटले आहे, त्याची भूमिका योग्य आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्‍न सुटणार असेल तर आनंदच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com