संभाजीराजे तुम्हाला मानाचा मुजरा, पण इस्टेटीचे वारसदार असणाऱ्यांना माफी नाही!

नुसत्या छत्रपती शाहू महाराजांचे इस्टेटीचे वारसदार झालेले आहेत, त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा झालेला अपमान दिसत नाही.
kolhapur ncp criticizes samarjitsinh ghatge and praises sambhajiraje chhatrapati
kolhapur ncp criticizes samarjitsinh ghatge and praises sambhajiraje chhatrapati

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अवमानाबद्दल भाजप खासदार असूनही छत्रपती संभाजीराजे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफी मागण्यासाठी ठणकावले. त्यांच्या या करारी व स्पष्टवक्तेपणाबद्दल आमचा मानाचा मुजरा. पण, महाराजांच्या इस्टेटी लाटून स्वतःला जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे मात्र गप्प राहिले. धन्य आहेत ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इस्टेटीचे वारसदार, असा पलटवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना उद्देशून कागल राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

यावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवरील मूळ गादीची भक्ती आणि यांचीही भक्ती यातीलही जमीन-अस्मानचा फरक स्पष्ट होतो. तसेच राजकीय स्वार्थासाठी सातत्याने स्वतःला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार म्हणून एक प्रकारे कोल्हापूरच्या गादीचाही हे अवमानच करीत आहेत, असा टोलाही यासंदर्भात प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात लगावला आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करताना त्यांचा 'सामाजिक कार्यकर्ते' असा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे शाहूप्रेमी जनता खवळून उठली. त्याच दिवशी छत्रपती श्रीमंत शाहूमहाराज व छत्रपती संभाजीराजे यांनी माजी मुख्यमंत्री श्री . फडणवीस यांनी माफी मागावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्या स्वाभिमानी छत्रपती घराण्याला आमचा मानाचा मुजरा, असे या पत्रकात म्हटले आहे.

नुसत्या छत्रपती शाहू महाराजांचे इस्टेटीचे वारसदार झालेले आहेत, त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा झालेला अपमान दिसत नाही. ही घटना ते फारच हलक्‍यावर घेत आहेत. तसेच श्री. फडणवीस यांच्याकडून अनावधानाने वगैरे झालेली चूक, अशा शब्दांचा वापर करून हे वारसदारही पुन्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान करण्याचा प्रमाद करीत आहेत. हे निषेधार्ह आहे. या इस्टेटीच्या वारसदारांना जनता भविष्य काळामध्ये माफ करणार नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळाचा कार्यक्रम हा सध्याच्या गादीचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. महाराजांच्या गादीचे प्रमुख उपस्थित असताना स्वतःला जनक म्हणून घेणे कितपत योग्य आहे? असा आमचा सवाल पत्रकात उपस्थित केला आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या इस्टेटीचे वारसा सांगणाऱ्या महाराजांच्या पुरोगामी समतेचा विचार कधीच समजणार नाही. कारण या विचाराच्या एकदम विरोधी असणाऱ्यांना आम्ही गरीब रयत कसे समजून सांगणार? अशीही विचारणा या पत्रकात करण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकवर प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, नविद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, नितीन दिंडे, संजय चितारी, प्रवीण काळबर, आनंदा पसारे, बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, रमेश माळी, संग्राम लाड, गंगाधर शेवडे, रविंद्र मर्दाने, संजय चितारी, माधवी मोरबाळे आदींच्या सह्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com