मराठा समाज आक्रमक..आज कोल्हापुरात मूक आंदोलन

आंदोलनात हसन मुश्रीफ ,सतेज पाटील, प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.
0Sambhajiraje_20F.jpg
0Sambhajiraje_20F.jpg

कोल्हापूर  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पहिल्या टप्यात पाच जिल्ह्यात हे आंदोलन होत आहे. आज सकाळी अकरा वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून आंदोलनास सुरवात होईल.  kolhapur maratha kranti muk andolan kolhapur outline of protest

या आंदोलनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , पालकमंत्री सतेज पाटील,  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. आज सकाळपासून शाहू समाधी स्थळी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्ते जमा होत आहे. आंदोलनाची तयारी पूर्ण झालेली आहे. सहा जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. आजच्या आंदोनलनात

महाविकास आघाडीतील अनेक नेतेही सहभागी होणार आहेत. 

आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना उलटसुलट न बोलण्याचं आवाहन संभाजीराजेंनी काल मराठा आंदोलकांना केलं आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यानंतर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात होणार आहे. दुपारी संभाजी राजे समन्वयकांना मार्गदर्शन करणार आहेत. 

या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हेही सहभागी होत मराठा आरक्षणाला जाहीरपणे पाठिंबा देणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर आंबेडकरांशी चर्चा केली होती.  संभाजीराजे यांची भेट झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत राजकीय गुगली टाकली होती. राज्यातील सध्याच्या राजकारणात शिळेपणा आलेला आहे. त्यामुळे राजकारणात ताजेपणा आणण्याची आवश्यकता आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर आगामी काळात राज्यातील राजकारणात नक्कीच ताजेपणा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचे नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असे वक्तव्य अॅड. आंबेडकर यांनी केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता दोनच पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आणि दुसरा ही याचिका जर फेटाळली गेली तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे आंबेडकर म्हणाले होते. 

संभाजीराजे यांनी पुण्यात उदयनराजे यांचीही भेट घेतली. ही भेटही ऐतिहासिक ठरली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट संभाजीराजेंनी घेतली आहे. त्यांनी सरकारपुढे काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण अद्याप सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते आजपासून आंदोलनाला सुरूवात करणार आहेत.
 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com