jayant patil.jpg
jayant patil.jpg

जयंत पाटील हे पाहुण्यासारखे सांगलीत येतात आणि जातात...

पोलिस व महसूल यंत्रणा सर्वसामान्याला कायद्याचा बडगा दाखवुन वारेमाप दंड वसूल करतात. मग सर्वसामान्याला कायदा आणि तुम्हाला व पालकमंत्र्यांना वेगळा कायदा आहे का, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.

इस्लामपूर : कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या चिंता निर्माण करणारी असताना महसूल अधिकारी, पोलिस हे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गर्दीच्या कार्यक्रमास हजेरी लावुन कायद्याचा भंग करताना दिसत आहेत. ही बेजबाबदारी जनतेच्या जिवावर बेतणारी आहे. यामुळे कोविड आटोक्यात येण्याऐवजी हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. पालकमंत्री व महसूल अधिकार्‍यांनी जबाबदारी व कोविडचे गांभीर्य ओळखुन जनतेवरील संकटाला सामोरे जावे. कोविड संकटात पालकमंत्री व महसूल विभाग पूर्णता: अपयशी ठरला असल्याचा आरोप आज इस्लामपूर येथे सर्वपक्षीय कृती समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते शाकीर तांबोळी व भाजपाचे शहरध्यक्ष अशोकराव खोत म्हणाले,"कोविडच्या वाढत्या रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे कोणतेही नियोजन नाही. पालकमंत्री आठ दिवसांतून पाहुण्यांसारखे येऊन जिल्हाधिकार्‍यांच्या बरोबर आढावा बैठकीचा ड्रामा करतात व मतदारसंघात हाजारो लोक एकत्रित गोळा करून रेशन कार्ड वितरण करण्याचा कार्यक्रम घेतात. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी उपस्थित रहातात. हे दुर्दैवी आहे. पोलिस व महसूल यंत्रणा सर्वसामान्याला कायद्याचा बडगा दाखवुन वारेमाप दंड वसूल करतात. मग सर्वसामान्याला कायदा आणि तुम्हाला व पालकमंत्र्यांना वेगळा कायदा का? 

बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील म्हणाले, "पालकमंत्री व महसूल अधिकारी जोमात तर जनता कोमात, अशी परिस्थिती सांगली जिल्ह्याची झाली आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्व प्रशासन यंत्रणेला कोवीडचे गांभीर्य नाही. नियोजन शून्य कार्यक्रम हाती असुन नुसत्या इशार्‍यावर कोविड आटोक्यात येणार नाही. पालकमंत्र्यांचे जनतेतील कार्यक्रम बाजुला ठेवुन जबाबदारीचे भान ठेवून जिल्ह्यावर आलेल्या परिस्थितीला जिल्हाधिकारी व महसुल अधिकार्‍यांनी सामोरे जावे. सध्या अलिशान कार्यालयात बसुन इशारा देण्याशिवाय अधिकारी काय करत नाहीत. कायदा व अधिकाराचा धाक दाखवुन जनतेत भिती निर्माण करत आहेत. खर्‍या अर्थाने अधिकार्‍यांनी योग्य नियोजन करुन स्वत: स्वयंशिस्त पाळत जनतेला धीर व आधार द्यावा."

रासपचे धनाजी गावडे, भाजपचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मकरंद करळे, आरपीआयचे आप्पासाहेब कांबळे, प्रहारचे दिग्विजय पाटील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com