घरापुढील अंगणातून सदाभाऊंचा इशारा : भविष्यात सरकारची झोप उडवू

माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण या आंदोलनाची हाक देऊन महाराष्ट्रभर 22 जिल्ह्यांत विविध ठिकाणी तसेच काही शहरांतही रयत क्रांती संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
sadabhau khot
sadabhau khot

इस्लामपूर ः रयत क्रांती संघटनेतर्फे संस्थापक माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता "अंगण हेच आंदोलनाचे रणांगण' हा नारा देत राज्यभर ऐतिहासिक डिजिटल आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. करोडो मजुरांच्या हाताला काम देणारा, हजारो व्यवसायिकांना व हजारो कंपन्यांना व्यवसाय देणारा, हजारो कोटी कर देणारा शेती हा उद्योग अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे, शेतकरी कर्जमाफीचे घोंगडे भिजत आहे, कृषिपंप वीजबिलातून शेतकऱ्यांना पूर्ण मुक्त करणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट पुढे असले तरी अन्नधान्याचा पुरवठा व निर्मिती करण्याची फार मोठी जबाबदारी शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे.

उद्योगधंद्यांचे गाऱ्हाणे मांडून शेतकऱ्यांच्या मागण्यांना बगल देता येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर व इतर छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यात शासनाच्या धोरणावर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा कोणताही शेतीमाल मार्केटिंग व्यवस्था कोलमडून पडल्याने योग्य भावात योग्य ठिकाणी विकू शकत नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून स्वतःच्या अंगणात घरात अगदी गायीच्या गोठ्यातही हे प्रतीकात्मक आंदोलन होत आहे.

माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण या आंदोलनाची हाक देऊन महाराष्ट्रभर 22 जिल्ह्यांत विविध ठिकाणी तसेच काही शहरांतही रयत क्रांती संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, शेतीपंपाचे वीजबिल माफ करा, उसाची एफआरपी पूर्ण करा, आधारभूत किमतीने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करा, अन्यथा प्रतिक्विंटल 100 रुपये अनुदान द्या, दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्या, कोरोनाच्या कहरीने ज्या शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे व फुले शेतात सडून गेली आहेत त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतमजूर व इतर कामगारांमध्ये ज्यांचे रेशनकार्ड नाही, त्यांना त्वरित धान्य द्या, खर्चासाठी दोन हजार रुपयांची सोय करा, या वर्षी सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत द्या अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या ऐतिहासिक डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही, तर भविष्यात सरकारची झोप उडविणारे अनोखे आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.

पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक, सदाभाऊ यांच्या आई रत्नाबाई, पत्नी सौ. सुमन खोत, मुलगा सागर खोत तसेच जयकर कचरे, रवींद्र खोत व राजू खोत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com