नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश - Hundreds of Shiv Sainiks join BJP in support of Nanar project | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

हा भविष्यातील शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरवात आहे.

राजापूर : ''विकासाचा मारेकरी ठरलेल्या शिवसेनेचा त्याग करून राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा भविष्यातील शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटाची सुरवात आहे, असा घणाघात भाजपाचे प्रदेश चिटणीस, रत्नागिरी जिल्हा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला. या वेळी त्यांनी कोकणच्याच नव्हे तर देशाच्या विकासाला गती देणारा रिफायनरी प्रकल्प होणारच आणि तोही नाणार परिसरामध्ये, अशी गर्जनाही केली. (Hundreds of Shiv Sainiks join BJP in support of Nanar project)

शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहामध्ये शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, लांजा तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, देवगड तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे उपस्थित होते. 

हेही वाचा : प्रणिती शिंदेंनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा; कारण...

प्रमोद जठार म्हणाले, ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाऊन तळागाळात संघटना वाढविली, त्यांची आज पक्षामध्ये किंमत राहिलेली नाही. कायमच भावनिक राजकारण करून शिवसेनेने निवडणूका जिंकल्या. मात्र, कोकणातील जनता आता शहाणी झाली आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आश्वासनाला आता ती बळी पडणार नाही. कारण तिने आता आपला विकास आपणच करायचे ठरवलं आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाचे मारेकरी असलेले शिवसेनेचे हे निष्क्रिय आमदार आणि खासदार पुन्हा कधीही निवडून येणार नाहीत, असा निर्धार करा आणि यांना कायमचे कोकणातून हद्दपार करा.

विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून काजवे, आंबेरकर यांनी केलेला भाजपप्रवेश निश्‍चितच कौतुकास्पद असून त्यांच्या प्रयत्नांना निश्‍चितच फळ येणार. रिफायनरी राजापुरातच आणि ती ही नाणार परिसरातच होणार, याचीही पुनर्रचार यांनी केला.
 
 
प्रमोद जठार म्हणाले

►शिवसेनेने भावनिक राजकारणाने निवडणूका जिंकल्या
►निष्क्रिय लोकप्रतिनिधी कोकणच्या विकासाचे मारेकरी
►काजवे, आंबेरकर यांचा भाजपप्रवेश कौतुकास्पद
►रिफायनरी राजापुरातच आणि तीही नाणारमध्येच होणार 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख