शेतकरी प्रश्‍नासाठी अमित शहांची कॉलर धरू, राजू शेट्टींचा इशारा 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असातानच पोलीसांनी कार्यकर्त्यांच्या वाहनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला.
 शेतकरी प्रश्‍नासाठी अमित शहांची कॉलर धरू, राजू शेट्टींचा इशारा 

कोल्हापूर : दिल्लीत शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि शेतकरी मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकार विरूध्द कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळताना पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. 

माजी खासदार राजू शेट्टी यांचीही कॉलर धरून त्यांना आंदोलनाबाहेर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्ते अधिक संतप्त होवून कार्यकर्ते पोलीसांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान, पोलीसांनी शेट्टींची माफी मागावी, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देणे सुरु केल्या.

यावर शेट्टी यांनी पोलीसांनी त्यांचे काम केले आता शेतकरी प्रश्‍नांसाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची कॉलर धरू असे उत्तर दिले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असातानच पोलीसांनी कार्यकर्त्यांच्या वाहनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस हे मोदींचे हस्त आहेत का ? असा सवाल करत पोलीसांच्या हातातील पुतळा काढून घेण्यासाठी झटापट करु लागले यातच एका वरिष्ठ पोलीसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची कॉलर पकडून आंदोलनातून बाहेर घेण्याचा प्रयत्न केला. 

हे सर्व कायकर्त्यांच्या समोरच झाले. त्यामुळे संतप्त कार्यकर्ते पोलीसांच्या अंगावर धावून गेले. परिस्थिती पोलीसांच्या हाताबाहेर जाण्याचा परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राखीव पोलीस दलाची एक तुकडी मागवण्यात आली. 

दरम्यान, पोलीसांनी श्री शेट्टीींयांची माफी मागणी असा आग्रह धरण घोषणा दिल्या. पण शेट्टी यांनी समजूदारपणा दाखवत पोलीसांनी आपले काम केले. आता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कॉलर पकडून त्यांनाच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला लावू असे आवाहन केले. यावर कार्यकर्तेही शांत झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com