महाराष्ट्रात तीन सावत्र भावाचे सरकार : सदाभाऊ खोत यांची टीका - Government of three step brothers in Maharashtra says Sadabhau Khot | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

महाराष्ट्रात तीन सावत्र भावाचे सरकार : सदाभाऊ खोत यांची टीका

सुनील पाटील
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

राज्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केली. 

कोल्हापूर : राज्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी सरकारने तात्काळ पॅकेज जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पण, सरकार हे तीन  सावत्र भावांचे आहे. प्रत्येकाचे मत जाणून घेतल्याशिवाय कोणच काही जाहीर करु शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात पॅकेज जाहीर करावे. या मागण्यांसाठी सरकारला जाग आणण्यासाठी गुरुवारी (ता. 22) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तहसिलदार कार्यालयावर जागर, गोंधळ आंदोलन करणार आहे, असल्याची माहिती रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज दिली.

दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता, ऊस परिषदेतील दर पंधरा वर्षात कधीच मिळाला नाही,अशी टिका सदाभाऊ खोत यांनी केली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खोत म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामात उगाच आंदोलन करुन किंवा आम्हाला येवढाच दर पाहिजे म्हणून हट्ट करुन चालणार नाही.

एक रक्कमी एफआरपी आणि भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर प्रतिटन 200 रुपये द्यावेत. तसेच, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जावी. साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीचा पहिला हप्ता विनाकपात द्यावा. त्यानंतर भविष्यात साखरेचे दर वाढले तर प्रतिटनाला 200 रुपये जादा द्यावेत. सरकारनेही साखरेची आधारभूत किंमत वाढवावी. यासाठी सरकारने ताकद लावली पाहिजे. 

उगाचे आमुक येवढा दर मिळाला नाहीतर ऊसाचे कांडेही तोडू देणार नाही, ही भूमिका घेणे योग्य नाही. तर, कायद्यानेचे एफआरपी देणे बंधनकारक आहे. तर आपण पहिले हक्काचे मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्या नंतर इतर उत्पादनातील हक्क मागण्यासाठी आपण रस्त्यावर उतरले पाहिजे. ऊस परिषद किंवा आंदोनलाच्या पार्श्‍वभूमीवर जो दर साखर कारखानदारांसोबत ठरला जातो. तो दर गेल्या पंधरा वर्षात कधीच मिळालेला नाही,अशी टिकाही यावेळी खोत यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख