Gokul Election : सतेज पाटलांचे तीन उमेदवार विजयी, महाडिक गटाची धाकधूक वाढली 

गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 In Gokul election, three candidates of Rajshri Shahu Shetkari Aghadi won .jpg
In Gokul election, three candidates of Rajshri Shahu Shetkari Aghadi won .jpg

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत अनुसुचित जाती गटातून विरोधी आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर,  इतर मागासवर्गीय गटातून अमर पाटील, तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून बयाजी शेळके विजयी झाले. मिणचेकर यांना ३४६, तर पाटील ४३१ मते मिळाली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलमधील हे उमेदवार असून त्यांच्या विजयाने समर्थकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. In Gokul election, three candidates of Rajshri Shahu Shetkari Aghadi won

निवडणुकीत सत्तारूढ गटातील विद्यमान संचालक विलास कांबळे (अनुसूचित जाती), पी. डी. धुंदरे ( इतर मागासवर्गीय? व विश्वास जाधव (भटक्या विमुक्त) पराभूत झाले आहेत. महिला गटांत रस्सीखेच सुरू असून सत्ताधारी गटाच्या अनुराधा पाटील-सरूडकर यांना ४१५ तर शौमिका महाडिक यांना ४१० मते मिळाली आहेत. विरोधी गटातील सुश्मिता पाटील यांना ४२० तर अंजना रेडेकर यांना ४६३ मते मिळाली आहेत.

दरम्यान, मिणचेकर यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पालकमंत्री सतेज पाटील व मिणचेकर यांच्या नावाचा जयघोष करत गुलालाची उधळण केली.

पश्चिम महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध (Gokul Dudh Sangh Result) संघावर कुणाची सत्ता? हे आज स्पष्ट होणार आहे. गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik), माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. 

गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुपारपर्यंत मतदारांचा कौल कळणार आहे. 

पाटील यांच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीचे तीन उमेदवार विजयी
सुजीत मिणचेकर – 346 मतांनी विजयी
अमर पाटील – 436 मतांनी विजयी
बयाजी शेळके – 239 मतांनी विजयी
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com