निवडणूक संपली..मैत्री जपली..'गोकुळ'चे तीन संचालक पुन्हा नव्याने भेटले... - Gokul Dudh Sangh Vishwas Patil, Arun Dongle met Ravindra Apte | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक संपली..मैत्री जपली..'गोकुळ'चे तीन संचालक पुन्हा नव्याने भेटले...

सुनील पाटील 
शनिवार, 8 मे 2021

रवींद्र आपटे यांची सर्वांशीच चांगली मैत्री आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) Gokulसंघाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून असणारे गोकुळचे तीन दिग्गज संचालक आज पुन्हा नव्याने भेटले. गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे हे आजारी असल्याने गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील Vishwas Patilआणि अरुण डोंगळे Arun Dongleयांनी आज श्री आपटे यांच्या घरी जाऊन आपटे यांच्या तब्येतीची विचारपूस करून आपली मैत्री जपली आहे. Gokul Dudh Sangh Vishwas Patil, Arun Dongle met Ravindra Apte

शांत संयमी असलेले गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांची सर्वांशीच चांगली मैत्री आहे. गोकुळ मध्ये त्यांचा शब्द ओलांडणारे शक्यतो कमीच आहेत. त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येक जण त्यांचा मित्र होऊ पाहतो. अशा मध्येच गेल्या दोन महिन्यापासून आपटे हे सत्तारूढ आघाडीतून गोकुळची निवडणूक लढवली. तर सत्तारूढ मधून वेगळी भूमिका घेत ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगरे यांनी विरोधी आघाडीतून निवडणूक लढवली.  

आपटे हे आजारी असतानाही काही ठिकाणी प्रचारामध्ये दिसत होते. गोकुळ प्रचारादरम्यान पाटील, डोंगळे व आपटे या तिघा मित्रांना एकमेकांसोबत चर्चाही करता आली नाही. मतदान झाले मतमोजणी ही झाली यामध्ये पाटील आणि डोंगरे यांना चांगला विजय मिळवता आला तर श्री आपटे यांना पराभव पत्करावा लागला. मात्र आजारी असलेले आपटे यांना दिलासा देण्यासाठी पाटील व डोंगळे यांनी आज आपटे यांचे निवासस्थान गाठले व मनसोक्त गप्पा मारल्या.

‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी या दोन संचालकांची नावे आघाडीवर  
कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) (Gokul) संघाचे अध्यक्ष निवड शुक्रवारी (ता. 14 मे) होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (Vishwas Patil) व अरुण डोंगळे (Arun Dongle) यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून करवीर तालुका प्रांताधिकारी वैभव नावडकर काम पाहतील. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व नवोदित संचालकांना निवडीच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. गोकुळ दूध संघासाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीनंतर आणि धक्कादायक निकालानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे या दोघांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. या दोन्ही संचालकांमुळे तसेच, पालकमंत्री सतेज पाटील आणि  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या योग्य नियोजनामुळे गोकुळच्या राजश्री शाहू शेतकरी पॅनेलला भरघोस यश मिळाले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख