संभाजीराजेंच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन... - gas pipeline project at Kolhapur Sambhaji Raje Chhatrapati | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

संभाजीराजेंच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आज गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कोल्हापूर शहर गॅस प्रकल्पाचा औपचारिक कार्यारंभ आज गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर  होणार आहे. 

कोल्हापूर : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली शहर गॅस वितरण योजना कोल्हापूरला मंजूर होऊन अनेक वर्षे झाली होती. महापालिकेच्या परवानग्या आता मिळाल्या असून प्रकल्पाचा औपचारिक कार्यारंभ आज गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर  होणार आहे. 

कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून मोजक्याच म्हणजे पाच ते सहा नेतेमंडळींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि बाकी नेतेमंडळीच्या ऑनलाईन उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. आज (ता.13) दुपारी तीन वाजता राजगंगा अपार्टमेंट, दत्त मंदिर समोर, शिवराज कॉलोनी, कदमवाडी, कोल्हापूर येथे होणार आहे.  

कार्यक्रमस्थळी संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक,आमदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार चंद्रकांत जाधव हे उपस्थित राहतील. उर्वरित जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहतील.

हेही वाचा : दोन मंत्री असूनही 'रेमडेसिव्हिर’ची इंजेक्‍शन मिळत नाहीत
 
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला पाचशेच्या घरात गेली आहे. सध्या 578 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या काळात होलसेल औषध आज विक्रेत्यांकडे (स्टॉकिस्ट) आज अवघी 199 रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा साठा आहे. जिल्ह्यात दोन मंत्री असूनही सरकारकडून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ एक टक्का आहे. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता रुग्णांवर रेमडेसिव्हिरची भीक मागण्याची वेळ येऊ नये, असा इशारा राज्य औषध विक्रेता परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. विजय पाटील म्हणाले,"जिल्ह्यातील केवळ तीन होलसेल औषध विक्रेत्यांकडे सध्या केवळ 199 रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा साठा आहे. हा साठा किमान दोन दिवस पुरेल. आणखी दोनशे ते अडीचशे इंजेक्‍शन येणार आहेत. मात्र कोरोनाबाधित वाढले तर इंजेक्‍शनचा पुरवठा करू शकणार नाही. चार-पाच दिवसांनी रुग्णांच्या नातेवाईकांवर इंजेक्‍शनची भीक मागण्याची वेळ येईल. त्याला जबाबदार प्रशासन असेल. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शासनाकडे पाठपुरावा करून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन अधिकाधिक उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख