रायगडमध्ये दरड कोसळून चार जणांचा मृत्यू; मदतीसाठी महाड येथे हेलिकॉप्टर दाखल  

पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
 Four persons died due to landslide in Sutarwadi area .jpg
Four persons died due to landslide in Sutarwadi area .jpg

रायगड : राज्यात मुसळधार पावसाने (Heavy rain) काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळून, महाड आशा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग बंद झालेले आहेत. पूरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे. आज (ता. २३ जूलै ) पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील (Raigad) महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस कंट्रोल रूमकडून मिळाली आहे. (Four persons died due to landslide in Sutarwadi area) 

पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दरड कोसळ्यामुळे आणि अनेक रस्ते पाण्यासाठी असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यास अडणी निर्माण होत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की ''महाडला जायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, टोळ फाट्याला प्रचंड पाणी असल्याकारणाने आम्ही थांबलेलो आहोत. एन. डी. आर. एफच्या मदतीने बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाड शहर पूर्ण पणे पाण्याखाली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मत्री गिरीष महाजन होते. 

लोक आपल्या स्व: रक्षणाकरिता गच्चीवर आणि एसटीच्या टपावर बसली आहेत. महाडमध्ये सर्व गाव पुराने वेढलेली आहेत. महाड वसियांच्या रक्षणा करीता हेलिकॉप्टर येत असल्याने त्यांना सुरक्षीत स्थळी पोहोचवण्या करिता मदत होईल. आम्ही मुंबईला संपर्क करून जीवनावश्यक वस्तू त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, अडचण अशी आहे की त्यांच्यापर्यंत त्या वस्तू कशा पोहोचतील कारण पुरामुळे समन्वयाच्या अडचणी आहेत. आम्ही महाड वासियंच्या मदतीकरिता पुढे कसे जाता येईल अशी धडपड करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com