The former MP says, 'I was connecting the pipe, say what?' | Sarkarnama

माजी खासदार म्हणतात, 'पाईप जोडत होतो, बोला काय म्हणताय?"

संपत मोरे
रविवार, 31 मे 2020

शेतातील रोजची कामे करत आहेत. अगदी वैरणकाडीपासून ते पाणी देण्यापर्यंत ते कामे करीत आहेत. अगदी सामान्य शेतकऱ्यांसारख त्यांचं जीवन सुरू आहे.

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून शेतात रमलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सकाळी मजले आणि तमलदगे गावातील डोंगरावर जाऊन करवंदाचा आस्वाद घेतला. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याच्या सीमारेषेवरची ही दोन गावे आहेत. याबाबत त्यांनी फेसबुकवर फोटो पोस्ट केले आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी लॉकडाउन सुरू झाल्यावर शेतातील कामात लक्ष घालायला सुरुवात केली. "अनेक वर्षांनी माझ्यातला शेतकरी जागा झाला. माझ्या कुटुंबाला मी पारखाझालो होतो. आता त्यांना वेळ देता येतोय, "अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

खासदार राजू शेट्टी लॉकडाउनच्या काळात शेतात रमले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी शेतात लक्ष घातले आहे. ते रोज सकाळी रानात जातात. आणि सायंकाळी रानातून घरी येतात. या काळात त्यांचे सर्व राजकीय दौरे बंद आहेत. फोनवरून लोकांच्या अडचणी सोडविण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी घराच्या बाहेर जाणे टाळले आहे. मात्र, शिवाराची संगत
धरली आहे. त्यांच्या आई, पत्नी, मुलगा यांच्यासोबत ते शेतातील रोजची कामे करत आहेत. अगदी वैरणकाडीपासून ते पाणी देण्यापर्यंत ते कामे करीत आहेत. अगदी सामान्य शेतकऱ्यांसारख त्यांचं जीवन सुरू आहे.

 

'मन की बात' मधून मोदींनी 'यांचे' केले कैातुक 

 

याकाळात कोणी त्यांना फोन केल्यास तो अनेकदा उचलला जात नाही. पुन्हा काही वेळाने त्यांचाच फोन येतो. ते सांगतात 'पाईप जोडत होतो. बोला काय म्हणताय?" मग संवाद सुरू होतो. एवढे राजू शेट्टी शेतात बिझी झाले आहेत. आज राजू शेट्टी यांनी मजले तमलदगे गावाचा डोंगर गाठला. डोंगरावर जाऊन त्यांनी करवंदाचा आस्वाद घेतला. त्यांनी डोंगरावरचे
फोटो फेसबुकवर शेयर केले आहेत." आस्वाद रानमेव्याचा. मजले व तमदलगे डोंगरामध्ये आज रानमेव्याचा आस्वाद घेतला!" असं शेट्टी यांनी म्हटले आहे.

 

 

ही बातमी वाचा : सरकार पाच वर्ष टिकेल ; अंतर्विरोधाचे त्रांगडे होणार नाही... 

पुणे : राज्य सरकारमध्ये अंतर्विरोध कुणाला दिसत असेल तरी सरकार पाच वर्षाचा काळ पूर्ण करेल, असा ठाम विश्वास 'सामना' च्या 'रोखठोक' या सदरात खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील 'ठाकरे सरकार' अंतर्विरोधाने पडेल, असे विरोधकांना का वाटते? तसे घडणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाने प्रदर्शन
'शिवसेने- भाजप'मध्ये घडले तेव्हा सरकार टिकले. मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरले, मग आताच कसे पडेल, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना केला आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, ते स्वतःच्या अंर्तगत भांडणातून पडेल, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा अर्थ असा होतो की सरकार
पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत. त्यामुळे तीन पक्षात काही फाटेल आणि सरकार पडेल, अशी आशा विरोधी पक्षाना आहे. गेल्या पंधरा दिवसात मुंबईपासून दिल्लीपर्यंत राज्य सरकार पडेल, अशी वावटळ उठली त्याबाबतचा धुराळा अजूनही उडत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख