कंत्राटदारामागे लागून बदनाम होऊ नका : मुश्रीफांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्‍या 

पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना आराखड्याच्या 10-10 टक्‍के निधी मिळणार आहे. त्यामुळे कंत्राटदार विविध योजना सांगतील. कंत्राटदारांच्या मागे लागून बदनाम होऊ नका. चांगली कामे करा.
Don't be discredited by following the contractor: Mushrif
Don't be discredited by following the contractor: Mushrif

कोल्हापूर : पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना आराखड्याच्या 10-10 टक्‍के निधी मिळणार आहे. त्यामुळे कंत्राटदार विविध योजना सांगतील. कंत्राटदारांच्या मागे लागून बदनाम होऊ नका. चांगली कामे करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. 

वित्त आयोगातून निधी दिल्याबददल पदाधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांचा सर्किट हाउस येथे सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, मी पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा सदस्य आणि पदाधिकारी राहिलो आहे. निधीची काय अवस्था आहे, याची मला कल्पना आहे. जिल्हा परिषदेला किमान स्वनिधी आहे.

जिल्हा नियोजन मंडळातून निधीही मिळतो. मात्र, पंचायत समितीला काहीच मिळत नाही. त्यामुळे पंचायत समित्या बरखास्त कराव्यात, असे मी उद्‌वेगाने सभागृहात बोललो होतो. दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला आणि माझ्याकडे ग्रामविकास खाते आले. या खात्याचा मंत्री झाल्यापासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेला वित्त आयोगाचा निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु होते. 

केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी मी सतत पत्रव्यवहार केला. परिणामी, राज्यांच्या शिफारशीवर हा निधी देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार महाराष्ट्राने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतील 10 टक्‍के रक्‍कम जिल्हा परिषदेस, तर 10 टक्‍के रक्‍कम पंचायत समितीस देण्याचे मान्य केले. आज हा निधी उपलब्ध होत असल्याबददल समाधान वाटात असल्याचे मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले. 

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, करवीर पंचायत समिती सभापती अश्‍विनी धोत्रे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. 

पाच वर्षात एकही काम राहणार नाही 

पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना भरपूर निधी मिळणार आहे. यातील 50 टक्‍के निधी हा विकास कामांसाठी, तर 50 टक्‍के निधी पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामावर खर्च करायचा आहे. त्यामुळे झपाटून काम करा. पाच वर्षांत एकही काम शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी घ्या, अशी सूचना मुश्रीफ यांनी या वेळी केली. 

मुश्रीफ राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री 

राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणजे हसन मुश्रीफ. कोरोना असतानाही ते झपाट्याने काम करत आहेत. मागील 30 ते 40 वर्षांच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. ग्रामीण भागाची नाळ जोडलेले ते नेते आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यांच्यासारखेच काम करावे, अशी अपेक्षा आमदार राजेश पाटील यांनी व्यक्‍त केली. 

Edited By : Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com