जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर येतात...

देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांची शाहुपुरीमध्ये भेट झाली.
 Devendra Fadnavis and Chief Minister Uddhav Thackeray meet in Kolhapur .jpg
Devendra Fadnavis and Chief Minister Uddhav Thackeray meet in Kolhapur .jpg

कोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) आज (ता. ३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये ते शाहुपुरीत पाहणी करत होते. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही गुरुवार पासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शाहुपुरीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की देवेंद्र फडणवीस ही याच ठिकाणी आहेत. (Devendra Fadnavis and Chief Minister Uddhav Thackeray meet in Kolhapur) 

शाहुपुरीतल्या एका नागरिकाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सांगितले की आताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येथून पहाणी करून गेले. उध्दव ठाकरे यांनी लगेच आपण संयुक्त पहाणी करु असा प्रस्ताव पोहोचवण्यासाठी फोन केला. तो लागला नाही. मग शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीस यांचे स्वीय सचिव सुमित वानखेडे यांना फोन लावला. भाजप नेते तयार झाले अन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त पहाणी केली.

त्यामुळे कोल्हापूरमध्ये आज वेगळे चित्र पाह्याला मिळाले. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र पाहणी केली. यावेळी नियममीत येणाऱ्या पूरावर तत्काळ मार्ग काढावा लागेल, असे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांची शाहुपुरीमध्ये भेट झाली. यावेळी दोघांनीही संवाद साधला. तसेच शाहुपुरीतील नागरिकांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. 

दरम्यान, दरम्यान, फडणवीस यांनी गुरुवारी बेघर येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातील लोकांशी संवाद साधला होता. त्यांचे दुःख समजून घेतले. त्यांच्या सोबत जेवणही करून त्यांनी धीर दिला. त्यामुळे उपस्थीत बाधितांनाही आश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या दुःखाचा बांध तेथे मोकळा केला.

आम्ही तुमच्या सोबत असून आम्ही तुमचे भाऊ आहोत, असे म्हणत बाधित कुटुंबातील लोकांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. त्यांच्यासोबत जेवणाच्या आग्रहाचा स्वीकार करीत जेवणही घेतले. आमदार प्रविण दरेकर यांनी सुद्धा त्यांची सोबत बसून जेवण घेतले. फडणवीस आंबेघर येथे भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील लोकांची भेट घेण्यासाठी आले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com