काँग्रेस आमदाराचे पुत्र झेडपी अध्यक्ष होताच भाजपच्या गोटात पसरला आनंद!

या निवडी जाहीर करतानाच पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली.
Congress's Rahul Patil elects Kolhapur Zilla Parishad president
Congress's Rahul Patil elects Kolhapur Zilla Parishad president

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्‍हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भारतीय जनता पक्ष व घटक पक्षांनी थेट महाविकास आघाडीला पाठिंबा देत या निवडी बिनविरोध केल्या. जिल्‍हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना संधी देण्यात आली उपाध्यक्ष पदी राष्‍ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी यांना अक्षरक्ष: लॉटरी लागली. पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर होण्यापूर्वी तासभर अगोदर विजय बोरगे यांचे नाव बाजूला करत शिंपी यांना संधी देण्यात आली. (Congress's Rahul Patil elects Kolhapur Zilla Parishad president)

निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी पाटील आणि शिंपी यांच्या बिनविरोध निवडी घोषणा केली. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांच्या समर्थकांनी जिल्‍हा परिषद आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळला.

कोल्हापूर जिल्‍हा परिषदेची सदस्य संख्या ६७ इतकी आहे. यातील एक सदस्याचा मृत्यू झाला असून एक सदस्य अपात्र आहे. त्यामुळे ६५ सदस्य मतदानाचा अधिकार बजावणार होते. महाविकास आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांची सोमवारी (ता.१२) सकाळी बैठक झाली. या बैठकीत इतर चर्चांसह अध्यक्षपदी राहुल पाटील यांचे, तर उपाध्यक्षपदासाठी जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. ही नावे निश्‍चित झाल्यानंतर भाजप सदस्यांनी व नेत्यांनी सुटकेचा निःश्‍‍वास सोडला. याचवेळी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक यांना फोन करुन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले, त्याला विरोधक नेत्यांनीही  सकारात्‍मक प्रतिसाद दिला.

पदाधिकाऱ्यांची नावे निश्‍चित झाल्यानंतर राहुल पाटील व जयवंतराव शिंपी यांनी सकाळी ११ वाजता आपला अर्ज दाखल केला. दिलेल्या वेळेत इतर अर्ज न दाखल झाल्याने या दोघांची निवडी अंतिम झाली हेाती. दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात झाली. सत्ताधारी सदस्य फेटे बांधून सभागृहात दाखल झाले, तर विरोधकही सत्ताधाऱ्यांसोबतच सभागृहात उपस्‍थित राहिले. दुपारी २ वाजून ५ मिनिटांपर्यंत छाननी झाली, त्यानंतर दहा मिनिटे अर्ज माघारीसाठी ठेवली. पण, तिसरा अर्ज नसल्याने दोन वाजून १८ मिनिटांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडी जाहीर करतानाच पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली.

चंद्रकांतदादा हॉटेलमध्ये, तर महाविकास आघाडीचे नेते सर्किट हाऊसवर 

कोल्हापूर जिल्‍हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येणार, हे निश्‍चित होते. मात्र, काँग्रेसचे नेते आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना डावलले तर काय करायचे, याची रणनिती भाजपने ठरवली होती. एका हॉटेलमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेतेमंडळी बसून होती. तर सर्किट हाउस येथे महाविकास आघाडीचे नेते बसून होते. दोन्‍हीकडील माहितींची देवाणघेवाण सुरु होती. अखेर दहा वाजता राहुल पाटील यांचे नाव निश्‍चित झाले आणि भाजपच्या गोटात आनंदाला भरते आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com